नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

गोंडखैरी आरोग्य केंद्रांत कोविड-१९ लसीकरणात १३७ पत्रकारांसह वयोवृध्द जेष्ठ नागरिकांनी घेतली लस*

गोंडखैरी आरोग्य केंद्रांत कोविड-१९ लसीकरणात १३७ पत्रकारांसह वयोवृध्द जेष्ठ नागरिकांनी घेतली लस*

गोंडखैरी : केंद्र शासनाच्या आदेशानुसार कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा दि. ०१ मार्च २०२१ पासून जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ. दिपक सेलोकर जिल्हा परिषद नागपूर यांंच्या मार्गदर्शनात गोंडखैरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत सुरू झाला आहे. या टप्प्यात वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच वयाची ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण गोंडखैरी केंद्रांत सुरु असून सोमवार दि. २२ मार्च रोजी १३७ जेष्ठ पत्रकारांसह नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॕ. रौनक भोळे यांनी दिली. यावेळी खंडविकास अधिकारी महेंद्र डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे, सरपंच चांगदेव कुबडे, पंचायत समिती सदस्य विजय भांगे, प्रभाकर भोसले, पत्रकार योगेश कोरडे, राहुल आंजनकर, विकास बंसोड, विलास माडेकर, ग्राम सचिव हितेंद्र फुले, पटवारी केशव कुटे, पशुवैद्यकीय अधिकारी सुधाकर माहुरे सामाजिक कार्यकर्ता प्रदिप चनकापूरे, शंकर देशमुख, तालुका HB आरोग्य अधिकारी डाॕ.दिपा कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डाॕ. रौनक भोळे यांचेसह अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.