नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

उमरेड विधान सभेत महाविकासआघाडीचे उमेदवार संजय मेश्राम याची नांद लाप्रचार सभा

उमरेड विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार संजय मेश्राम याच्या प्रचारासाठी आता महिला ही बाहेर पडल्या असून प्रत्येक सर्कल मधे महिला घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत प्रत्येक सर्कल मधे संजय मेश्राम यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे

उमरेड . विधानसभेचा प्रचारा साठी कमी वेळ आहे. उमेदवार हा मतदार बांधवांन पर्यत पोहचण्यासाठी सर्व मार्गाचा वापर करत आहे. त्यामध्ये काँर्नर सभा , मिटिग , सभा, राँली , जाहीरनामा इ. प्रकार आहेत. महा विकास आघाडीचे उमेदवार संजय मेश्राम यांच्यासाठी तर काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी तर जबर आघाडी घेतली आहे याच बरोबर महिला बिग्रेड तर घर परिवार सांभाळुन प्रचारासाठी हातभार लावत आहेत. नांद येथे प्रसिध्द वक्ते आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे तेजस्वी वक्ते नितेश कराळे (मास्तर) यांची सभा पार पडली. या सभेत मास्तरांनी केन्द्र आणि राज्य सरकारवर चांगलेच टिकेचे झोड उठवले. शेतकरी बांधवांच्या कपाशी ,सोयाबीन व इतर शेतमालाला भाव नाही. सन्मान निधी च्या गोंडस नावाखाली शेतकरी बांधवांना निधी देण्यात येतो पन दुसरीकडे GST. च्या नावाने डबल लूट सुरु आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. राज्यातील सरकार हे अनैतिक मार्गाने आलेले आहे. पैशाचा माज असणारे हे जुलमी सरकार आपल्याला उखडून फेकायचे आहे त्यासाठी महा विकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करा या सरकारला मत पेटीतुन धडा शिकवा. महा विकास आघाडीचे उमेदवार संजय मेश्राम यांनी अभ्यासू भाषणाने उपस्थित मतदारांचे मने जिंकली आहेत. त्यांच्या सभेला मिळणारा तरुणांचा आणि महिलांचा प्रतिसाद बघून मतदारांचा हात कोणाच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी कोण्या भविष्य पाहाणाराची गरज नाही असे चित्र एकदम स्पष्ट झाले आहे. यावेळी बोलतांना संजय मेश्राम म्हणाले की, उमरेड विधान सभेत बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. काँग्रेसची पंचसुत्री योजनाच राज्याला तारू शकते व जनमाणसाचे कल्याण करु शकते
मोफत आरोग्य उपचार, महिलांना मोफत बस सेवा, शेत करी बांधवांनाच कर्ज मुक्ती या बाबी ठळक आहेत. नांद सर्कल मधील अंतर्गत रस्ते मजबूती करण करणेसाठी प्राधान्य देणार आहे. यावेळी गंगाधरजी रेवतकर, नंदाताई नारनवरे , बंडुभाऊ ठाकुनकर, जि.प सदस्य शंकर डडमल, नेमावली ताई माटे, पं स सदस्य माधुरीताई देशमुख, राहुल मेश्राम,ममता शेडे, कृष्णा घोडेस्वार ,लव जनबंधू, याचप्रमाणे बाजार समिती सदस्य, सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,एसटी एसटी बाई ओबीसी महिला सेल पदाधिकारी, महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते