नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

दिवाळी नंतर शरीर कसे डीटॉक्स करावे- स्वाती अवस्थी, चीफ डायटीशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर

रात्री चांगली झोप ही शरीर मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. ताजे, उत्साही तणावमुक्त राहण्यासाठी किमान 7-8 तास झोपण्याची सवय शरिराला लावा. दिवाळीनंतर शरिराचे डिटॉक्स हे उपाशीपोटी नव्हे तर उत्तम प्रमाणात नैसर्गिक, घरी शिजवलेले अन्न, योग्य विश्रांती, ध्यान पाण्याचा शरिराला पुरेसा पुरवठ्यामुळे केले पाहिजे.

नागपूर -भारतात बहुप्रतिक्षित साजरा होणार सण म्हणजे दिवाळी. रोषणाईल, पणत्या, फटाके आणि खाद्यपदार्थांचे या सणातविशेष आकर्षण असते. विशेषतः यात मिठाई, चकली, मूठभर चिवडा तोंडभर लाडू यावर यथेच्छ ताव मारला जातो. दिपावलीचा हा मुख्य सण नुकताच संपला आहे. त्यामुळे मागचा आठवडा आनंददायी वातावरणासोबतच चविष्ट पदार्थांच्या गोडवा देऊन गेला आहे. पार्ट्या, कौटुंबिक मेळावे, मित्र- मंडळीची मौजमजा उत्सवांनी सण साजरा करून झाला आहे. दिवाळी सणाच्या काळात फोडले जाणारे फटाके, धूर, वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण, तळलेले पदार्थ मिठाई खाल्ल्याने उष्मांकाने भरलेल्या अन्नपदार्थांमुळे शरीर मन आळसावले असते. वर्षातून एकदा हा आनंद लुटणे योग्य असले तरी, आता शरीराला आवश्यक विश्रांती देण्याची वेळ आली आहे.
आहारातील अतिरिक्त साखरेमुळे संप्रेरक (हार्मोन्स) असंतुलन, रक्तातील साखर रक्तदाब वाढून, मूड बदलणे, अपचनासारखे त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. सणासुदीच्या काळात अनेकदा गोड तळलेले खाद्यपदार्थ खाण्याचीही तीव्र इच्छा होत असेल. याला कसे सामोरे जाल ? सणाच्या वेळी उत्सव संपल्यानंतर आपण जे खातो, त्याचे कसे संतुलन राखतो, याचा आरोग्यावर प्रत्यक्षात फरक पडू शकतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, शरीरात जमा झालेली अतिरिक्त साखर चरबीपासून शरीर डिटॉक्स करू शकणाऱ्या सोप्या पद्धतींचे पालन केल्याने वजनावर नियंत्रण ठेवू शकता. सक्रियतेतून शरीराला पुन्हा आरोग्याकडे परत नेण्यासाठी ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी उत्सवानंतर डिटॉक्स त्यामुळेच महत्वाचे असते. हे केवळ विशिष्ट अन्न खाणे अथवा शरीराची उपासमार करण्यापूरते मर्यादित नाही. हायड्रेशन महत्त्वाचे- पाणी जलपदार्थ हे शरिराचे जीवन आहे. कारण आरोग्य, शरीर आणि कोमेजलेली त्वचा पुनरुज्जीवित करण्यासाठी पाणी अनेक प्रकारे मदत मिळते. त्यामुळे दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या. दिवसाची सुरुवात शक्य असेल तर गरम पाणी लिंबूने करा. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत मिळेल. शरीर प्रणाली डिटॉक्स करण्यासाठी नेहमी घन पदार्थांपेक्षा जास्त द्रवपदार्थ सेवन करणे लक्षात ठेवा. भरपूर पाण्यासोबत, तुम्ही नारळ पाणी ताक देखील पिऊ शकता. ताजी फळे, भाज्या आणि औषधी वनस्पतींपासून बनवलेल्या निरोगी स्मूदीज हा चांगला पर्याय ठरतो. कारण ते जीवनसत्त्वे खनिजांच्या चांगल्या पुरवठ्यासह डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. स्मूदी बनवण्यासाठी भाज्यांसह बेरी, केळी वापरा. कप कॉफी/चहा ग्रीन टीने बदला. ग्रीन टीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे चरबीचे ऑक्सिडेशन वाढवून शरीरातील पाण्याची चरबी काढून वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासही मदत मिळते. कॅलरीज बर्न करा- दिवाळीच्या काळात वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणता आहार घेतो त्यावर कसे नियंत्रण ठेवतो हा महत्त्वाचा भाग आहे. चालणे, ट्रेडमिलवरचा व्यायाम, योगासनाची निवड करा. अनेक आहार दिनचर्येचे पालन करू शकता. परंतु ती प्रभावी करण्यासाठी, तुम्हाला शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. चालणे ही सर्वोत्कृष्ट सर्वसाधारण पारंपरिक पद्धत आहे. ते प्रत्येक जण करू शकतात. चालणे किंवा इतर कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे घाम येतो, हृदयाची धडधड अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. चालण्याने पचनसंस्थेला चांगले कार्य करण्यास साखरेसह विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकण्यास मदत मिळते. काही मिनिटांसाठी योग ध्यानाचा सराव केल्याने निरोगी मन आणि शरीराचे योग्य प्रकारे संचालन करण्यास मदत मिळते. शरीरातील चयापचय रोगप्रतिकार शक्ती वाढवा- दिवाळीत वाढलेले वजन प्रतिबंध करून विस्कळीत संप्रेरक साखळी संतुलित करण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. त्यासाठी तळलेल्या पदार्थांना आता विश्रांती द्या. आहारात कच्ची फळे भाज्यांचा समावेश करा. त्यातून पाचनक्रिया सक्षम करण्यासाठी आवश्यक पोषक फायबर शरीराला मिळतील. हिरव्या भाज्या, पालक, काकडीतील पुरेसे अँटिऑक्सिडंट शरीराची चयापचय प्रक्रिया मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात लिंबू, टोमॅटो, संत्री, आवळा सारख्या व्हिटॅमिन सी ने समृद्ध पदार्थांचा समावेश करा. हे पदार्थ ताजेतवाने ठेवण्यासही मदत करतात. डिटॉक्स प्रक्रियेचा वेगवान मागोवा घेण्यासाठी तुमच्या सॅलडमध्ये बीटरूटचाही समावेश करा. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. निसर्गाची कास धरा- आवश्यक पोषक तत्वे, अन्न घटक, घरगुती शिजवलेले जेवण हे निरोगी शरीरासाठी महत्त्वाचे असते, हे कायम लक्षात ठेवा. बाजारातील प्रक्रिया केलेले पॅकेज केलेले खाद्यपदार्थ टाळा. कारण यामध्ये सिंथेटिक ॲडिटीव्ह प्रिझर्वेटिव्ह्जचे प्रमाण अधिक असते. शरिराला आवश्यक सूक्ष्म पोषक घटक, चांगली चरबी फायबर घटकांच्या अभावामुळे हे पदार्थ टाळा. शुद्ध आणि नैसर्गिक पदार्थ खा. ताजेतवाने, उत्साही ठेवतील. ताजी फळे, भाज्या, द्रवपदार्थांचा संतुलीत नैसर्गिक आहार हा प्रक्रिया केलेले स्नॅक्स, शितपेय, आईसक्रीम, चॉकलेटला पर्याय ठरून वजन कमी करण्यास मदत करतो. पुरेशी शांत झोप - दिवाळीच्या काळात झोपेचे घड्याळ बिघडले आहे. वेळी अवेळी झोप, पहाटे अभ्यंग स्नासाठी लवकर उठल्याने चयापचयाचेही संतुलन बिघडते. पुरेशा शांत झोपेची दिनचर्या विस्कळित होते पचन शोषण प्रक्रिया मंद होते. शरीरात आळस आम्लता वाढते. शरीर पोषक तत्वांचा परिपूर्ण वापर न करता ते साठवून ठेवते. त्यामुळे वजन वाढते. हे टाळण्यासाठी दिवाळीनंतर वेळेवर झोपण्याची नित्य पद्धतीचे झोपेचे वेळापत्रक पाळणे आवश्यक आहे. रात्री चांगली झोप ही शरीर मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात. ताजे, उत्साही तणावमुक्त राहण्यासाठी किमान 7-8 तास झोपण्याची सवय शरिराला लावा. दिवाळीनंतर शरिराचे डिटॉक्स हे उपाशीपोटी नव्हे तर उत्तम प्रमाणात नैसर्गिक, घरी शिजवलेले अन्न, योग्य विश्रांती, ध्यान पाण्याचा शरिराला पुरेसा पुरवठ्यामुळे केले पाहिजे. जीवनसत्त्वे, पाणी, फायबर युक्त अन्न, लिंबू या हंगामासाठी काही चांगले मित्र ठरू शकतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेली विश्रांती मिळू द्या.हॅपी डिटॉक्स/ दिवाळी संपली आहे..त्यामुळे शरिराच्या डिटॉक्ससाठी हीच वेळ आहे....