नागपूर -दुर्लक्षित समुदायासाठी सर्वसमावेशक निरोगीपणा कार्यक्रमांतर्गत डॉक्टर, फिटनेस उत्साही कोरोना विषाणू संक्रमणावर मात केलेल्यांच्या आरोग्यासाठी दत्ता मेघे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने टेलिमेडिसीन सेवा सुरू केली रुग्णालयाने आयएमएएस हेल्थकेअर क्लीव्हलँड क्लिनिकशी करार करीत ही टेलिमेडिसीन सेवा सुरू केली आहे.ख नागपूर भेटीवर आलेले क्लीव्हलँड क्लिनिकचे प्रख्यात पल्मोनरी क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. अखिल बिंद्रा, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक डॉ. अनुप मरार, कार्यकारी संचालक डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बिंद्रा म्हणाले, भारतात विशेषत: साथीच्या आजारानंतर आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे
कोरोना विषाणू संक्रमणानंतर झालेल्या लसीकरणामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासही त्यामुळे मदत होईल. या काळात क्षयरोग आणि एच 1 एन 1 सारखे आजार सार्वजनिक आरोग्यासमोर आव्हान ठरणार आहेत. या आजारांचा बचाव करण्यासाठी टेलिमेडिसीन सेवेतून भर दिला जाईल. क्लीव्हलँड क्लिनिकच्या इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख आयएमएएस हेल्थकेअरच्या संस्थापक दीपिका ग्रांधी म्हणाल्या, या टेलिमेडिसीन सेंटरमुळे नागपूरकरांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याची स्थिती गंभीर होण्याआधी आजार व्यवस्थापन करण्यासाठी सक्रिय दृष्टीकोन ठेवून सर्वोत्कृष्ट आरोग्य काळजी घेता येईल.
रुग्णालयाचे संचालक डॉ. मरार म्हणाले, हे केंद्र नागपूर आणि जागतिक दर्जाच्या वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये महत्त्वाचा दूवा म्हणून काम करेल. त्यामुळे नागपूरच नाही तर आसपासच्या प्रदेशातील रुग्णांना या क्षेत्रातील तज्ञांचे टेलीमेडिसीन द्वारे दूरचित्रवाहिनीवरून आभासी सल्लामसलत उपलब्ध करून देईल. यात प्रगत आरोग्यसेवा घराजवळ आणून, प्रतिबंधात्मक काळजी, जागतिक वैद्यकीय नेत्यांकडून तज्ज्ञ मार्गदर्शन रुग्णसेवा प्रदान केली जाईल.