नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

नितिनजी गडकरी यांच्या हस्ते स्मॉल फायनान्स बँकेच्या नव्या शाखेचे थाटात उदघाटन

माननीय श्री. नितिन जी गडकरी यांच्या हस्ते नागपूर, महाराष्ट्र येथे जना स्मॉल फायनान्स बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन नागपूरमधील शाखेच्या उद्घाटनानंतर बँकेच्या शाखांची संख्या ७७६ वर, बँकिंग सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध

नागपूर, - जना स्मॉल फायनान्स बँक, चे नागपूर, येथे शाखा सुरू केलीआहे. शाखेच्या उद्घाटनाने जना स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा पार करत बँकेच्या शाखांची संख्या ७७६ झाली आहे. राज्यात शाखांच्या नेटवर्कमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे शाखांची संख्या ८४ आहे. नवी शाखा बँकेच्या विस्तार योजनेचा भाग असून त्याद्वारे कंपनीने सेवा देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. नवी शाखा विविध प्रकारच्या बँकिंग सेवा उत्पादने पुरवणार असून त्यात बचत खाती, निश्चित ठेवी, कर्ज विम्याचा समावेश आहे. शाखेद्वारे डिजिटल बँकिंग सेवाही दिल्या जाणार आहे बँकिंग व इंटरनेट सेवांचाही समावेश आहे नागपूर शाखेच्या उद्घाटनानंतर जना स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखांची संख्या ७७६ वर गेली असून महाराष्ट्र ८४ शाखांच्या नेटवर्कसह चौथ्या क्रमांकावर आहे. १२ सप्टेंबर रोजी . नितिन जी गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. विनायक महामुनी, आईएएस, मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपुर जिला परिषद , कृष्णा पी खोपडे, आमदार, चंद्रशेखर गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग . रवी कासखेड़िकर, दयाशंकर तिवारी, माजी महापौर नागपुर, अजय बोढारे, माजी सभापति, पंचायत समिति, कांमठी हे मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते
जना स्मॉल फायनान्स बँकचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कंवल म्हणाले, नितिनजी गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटनाने आम्ही भारावून गेलो आहोत. माझ्यासाठी देशपातळीवरील आमच्या २२,००० कर्मचाऱ्यांसाठी हे प्रेरणादायी आहे. या लाँचमुळे महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील बँकेचे अस्तित्व मजबूत झाले आहे. ही शाखा व तेथील फिजिटल सेवांच्या माध्यमातून नव्या भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहोत जना स्मॉल फायनान्स बँकेच्या २४ राज्ये केंद्रशासित प्रदेशांत ७७६ शाखा आहेत. त्यापैकी २६१ शाखा म्हणजेच ३३.६ टक्के व्यवसाय अनबँक्ड रूरल केंद्र (युबीआर) आहेत.