नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

गिट्टीखदान लानरेंद्र जिचकार जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

काँग्रेस चे नेता व बहुजन विचार मंच चे अध्यक्ष नरेंद्र जिचकार यांनी पश्चिम नागपूर गिठ्ठी खदान ला जनसंपर्क कार्यालय चे उदघाटन करण्यात आले जनसामान्यांच्या समस्या चां निपटारा करण्यासाठी पश्चिम नागपुरात विविध क्षेत्रात जनसंपर्क कार्यालय आहेत

नागपूर:माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत मंगळवारी गिट्टीखदान परिसरात सामाजिक कार्यकर्ते बहुजन विचार मंचचे नरेंद्र जिचकार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कमलेश चौधरी किशोर जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजीव गांधी यांची जयंतीही साजरी करण्यात आली. यानंतर जिचकार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला बाबा वकील, सुखदेव मनोहर, घनश्याम ठाकूर, रामकृष्ण खडसे, अर्पित बागडे, श्यामसिंग ठाकूर, घनश्याम मांगे, इंद्रसेन ठाकूर, संजय कडू, खुशबू परमार, बाबा वकील, मोकिमभाई, बबलू पठाण, आसिफ अंसारी, इसाकभाई, जावेदभाई यांची प्रमुख उपस्थिती होती.