नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

रामदेवबाबा सॉल्व्हण्‍ट लिमिटेड आयपीओ १५ एप्रिल २०२४ ला लॉन्च

रामदेवबाबा सॉल्व्हेंट लिमिटेड, २००८ मध्ये स्थापन झालेली नागपूर-आधारित कंपनी, फिजिकल रिफाइन्ड राइस ब्रॅन ऑइलचे उत्पादन, वितरण, विपणन विक्री करण्यात अग्रेसर आहे.

नागपूर, - रामदेवबाबा सॉल्‍व्‍हण्‍ट लिमिटेड ही नागपूरमध्‍ये मुख्‍यालय असलेली, रिफाइन्‍ड राइस ब्रान ऑईलची उत्‍पादक व वितरक आहे. कंपनीने १५ एप्रिल २०२४ रोजी इनिशियल पब्लिक ऑफरिंग सादर करण्‍याची घोषणा केली आहे. कंपनीचा या आयपीओच्‍या माध्‍यमातून अपर प्राइस बँडमध्‍ये ५०.२७ कोटी रूपये निधी उभारनार आहे. इश्‍यू आकार १० रूपयांच्‍या दर्शनी किंमतीसह ५९,१३,६०० इक्विटी शेअर्स आहे. आयपीओमधून प्राप्त होणारे निव्‍वळ उत्पन्, नवीन उत्‍पादन सुविधा ‍स्थापित करण्‍यासाठी, पूर्णत: किंवा अंशत: परताव्‍यासाठी, आमच्‍या कार्यरत भांडवल गरजा व सामान्‍य कॉर्पोरेट खर्च यासाठी वापरण्‍यात येईल. अँकर पोर्शनसाठी बोली १२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होईल, इश्‍यू १५ एप्रिल २०२४ रोजी खुला होईल १८ एप्रिल २०२४ रोजी बंद होईल. रामदेवबाबा सॉल्‍व्‍हण्‍ट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक निलेश सुरेश मोहटा म्‍हणाले, आगामी आयपीओची घोषणा करताना आनंद होत आहे, जो विकास प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. या निर्णयामधून कंपनीच्‍या क्षमतांमधील विश्‍वास विस्‍तारीकरणासाठी नवीन संधींचा फायदा घेण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.धोरणात्‍मकरित्‍या स्थित उत्‍पादन सुविधा दर्जात्‍मक नियंत्रणासाठी उत्तम व्‍यवस्‍थापनाने वाढती दृश्‍यमानता व बाजारपेठ उपस्थितीसाठी उत्तमरित्‍या स्थित ठेवले आहे. या नवीन चॅप्‍टरची सुरूवात करत आम्‍ही उद्योगामधील विकास व नाविन्‍यतेसाठी संधींचा फायदा होणार आहे.
चॉईस कॅपिटल अडवायजर्स प्रायव्‍हेट लिमिटेडचे संचालक रतीराज तिब्रेवाल रामदेवबाबा सॉल्‍व्‍हण्‍ट लिमिटेडच्‍या आगामी आयपीओ आहे. या कंपनीने राइस ब्रान ऑईल उप-उत्‍पादनांचे उत्‍पादन व वितरण करण्‍यापर्यंत विविध कार्यसंचालनांमध्‍ये प्रभावी स्थिरता व अनुकूलला दाखवली आहे. धोरणात्‍मक उत्‍पादन सुविधा प्रमुख बाजारपेठांमधील प्रबळ उपस्थितीसह कंपनी भावी विकासासाठी उत्तमरित्‍या स्थित आहे. नाविन्‍यता व शाश्‍वततेप्रती कंपनीची कटिबद्धता कंपनीला आकर्षक गुंतवूणक संधी देते. इक्विटी, वेल्थ मॅनेजमेंट, एनबीएफसी ,आयपीओ बाँड्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, विलीनीकरण अधिग्रहण व्यवसाय यांसारख्या वित्तीय क्षेत्रातील सेवा प्रदान करणाऱ्या प्रीमियम क्लायंटसाठी गुडी पाडवा च्या निमित्ताने चॉईस ग्रुपने नागपुरात आपली दुसरी शाखा उघडण्यात आली. चॉईस ग्रुप ही भारतातील सर्वोच्च आर्थिक सेवां देण्यापैकी एक आहे ज्याची उपस्थिती २२राज्यांमध्ये ११५ शहरे, कर्मचारी संख्या ६००० हुन अधिक आहे. भारतात आणखी शाखा उघडण्याची योजना आहे.