नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

शासकीय औदोगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे आयोजन

तंत्र प्रदर्शन दि .29/12/23 ला 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा प्रशिक्षण अधिकारी सोंकुवर संस्थेचे उपसंचालक प्रमोद ठाकरे प्रमुख प्रा.अभय देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, डॉ.तेजराव घोरमाडे, शासकिय तंत्र निकेतन गडचिरोली, उपप्राचार्य चांदेकर, पुंड या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

नागपूर - शासकीय औदोगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे प्रदर्शनी मध्ये जिल्ह्यातील शासकीय व अशासकीय आयटीयातील विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल्स चे प्रदर्शनी होती तंत्र प्रदर्शनसाठी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय विद्यार्थीनी गर्दी केली. तंत्र प्रदर्शन दि .29/12/23 ला 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा प्रशिक्षण अधिकारी सोंकुवर संस्थेचे उपसंचालक प्रमोद ठाकरे प्रमुख प्रा.अभय देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, डॉ.तेजराव घोरमाडे, शासकिय तंत्र निकेतन गडचिरोली, उपप्राचार्य चांदेकर, पुंड या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी ढूमणे तर सूत्र संचालन दिलिप मस्की आणि आभार सुरेंद्र दुबे यांनी केले. तंत्र प्रदर्शन मधे 100 मॉडेल आले होते. या मॉडेल मधुन स्टार्ट अप साठी नक्की फायदा मिळेल.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेल मधुन समाजाच्या कारखान्याच्या पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणार आहे आयटीआय च्या माध्यमातून विद्यार्थी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करत आहे आत्मसात केलेल्या अभ्यासातून तंत्र प्रदर्शनीमध्ये त्यांच्या बुद्धीचां अनुभवाचा कस लागणार आहे हेच मॉडेल उद्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात उद्योजकांना चालना देण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.कमी वेळात विद्यार्थ्याना संस्थेतील सर्व शिल्प नीदेशक यांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मुलांनी दर्जदार मॉडेल्स तयार केले.