नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

जागतिक एड्स दिनानिमित्य श्री वेंकटेश महाविद्यालयात विविध कार्यक्रम

जागतिक एड्स दीन 1 डिसेंम्बर ला ग्रामीण रुग्णालय आय सी टी सी देउळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील श्री वेंकटेश कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात HIV AIDS बद्दल जनजागरण कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले संजय नगर ला रॅली काढण्यात आली

देउळगावराजा - जगात 1 डीसेम्बर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो हे ओचित्य साधून ग्रामीण रुग्णालय आय सी टी सी द्वारा श्री वेंकटेश कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध जण जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले समाजात युवक विद्यार्थी वर्गांना HIV एड्स बाबत समज गैरसमज जनजागृती च्या उदेशाने कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी सर्वप्रथम प्रा महेंद्र साळवे यांनी प्रास्तविक केले एड्स दीनाचे महत्व सांगितले मंचावर विराजमान पाहुणे वक्ते याचे स्वागत करण्यात आले आजच्या कार्यक्रम माचे अध्यक्ष प्रा ज्ञानेश्वर शिंदे होते प्रमुख वक्ते सुभाष गोळघाटे समुपदेशक आय सी टी सी भारत राठोड प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्योती ढोकळे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ महेश तांदळे एन सी सी अधिकारी प्रा निलेश काकडे प्रा रामेश्वर माने प्रा डॉ गजानन तांबडे प्रामुख्याने उपस्थित होते
उवस्थिताना समुपदेशक सुभाष गोळघाटे यांनी HIV AIDS बद्दल समज गैरसमज उपचार निदान ART बद्दल मार्गदर्शन केले प्रा शिंदे यांनी HIV AIDS ची नेमकी लक्षणे काय योग्य उपचार व नियंत्रण कसे राखता येईल याबाबत मार्गदर्शन केले तदनंतर संजय नगर ला HIV एड्स जनजागरण रॅली काढण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा महेंद्र साळवे तर आभार प्रदर्शन ज्योती ढोकळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत राठोड यांनी अथक परिश्रम घेतले