नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

स्वाधारगृहातील महिला व बालकांना दिवाळी भेट - भागवत प्रवचनकार अंजलीताई अनासाने

द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर तर्फे दिवाळी साजरी करण्यात आली स्वाधारगृह महिला व बालकल्याणआधारगृहाला भेट देऊन महिलांना साड्या, फराळाचे, बालकांना ड्रेस, बिस्किट केक कापून आनंद साजरा केला.

नागपूर :- श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर तर्फे दिवाळी साजरी करण्यात आली स्वाधारगृह महिला व बालकल्याण आधारगृहाला(नागपूर) भेट देऊन महिलांना साड्या, फराळाचे, बालकांना ड्रेस, बिस्किट केक कापून आनंद साजरा केला. निराधार महिला मुले सोबत सवांद साधला . भागवत प्रवचनकार अंजलीताई अनासाने यांनी उपस्थित जनसमुदायसमोर सांत्वना देऊन सकारात्मक जगण्याचा संदेश त्या दिला.
स्वाधार गृह महिला व बालकल्याणआधार गृह संचालिका उषाताई मालवीय यांनी पं. जवाहरलाल नेहरू, डॉ.राजेंद्र प्रसाद व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या काळातील ही संकल्पना साकारण्यात आली . अखंड कार्य सुरू आहे. संस्थेला 40 वर्ष पूर्ण होती आहे घटस्फोटीत महिला, निराधार महिला, अत्याचारी महिलांना आसरा देऊन त् प्रशिक्षण देण्यात येते . रस्त्यावरील निराधार मुले, इथे आसरा देऊन प्रशिक्षित सक्षम करण्याचा उपक्रम राबवतात कार्यक्रमास प्रामुख्याने उपाध्यक्ष रुपल दोडके, मायाताई हाडे, मनीषाताई दुबे ,अंजली दीक्षित, रितू जरगर ,वनश्री गर्गे ,लता खापेकर ,मंजू आसरे ,पुष्पा उमरेडकर,डॉ. अश्विनी व। नाशिककर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.