मदत सामाजिक संस्थे चा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
मदत सामाजिक संस्थेतर्फे २१वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा ५ नोव्हेंबर रोजी श्रीगुरुदेव सेवाश्रम येथे पार पडला. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, अध्यक्षस्थानी राधिकाबाई पांडव चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक गिरीश पांडव तर मदत सामाजिक संस्थेचे सचिव दिनेशबाबू वाघमारे, अ.भा. काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस अनिल नगरारे, नागपूर महानगरपालिका कर्मचारी बँकेचे अध्यक्ष ईश्वर मेश्राम व इतर सामाजिक कार्यकत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Nagpur Media News 2023-11-07 Smamajik