नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

डॉ सलील कुलकर्णी संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम नागपुरात रंगणार

आरिष इन्फ्रास्ट्रक्चर कम्पनी द्वारा नागपुरात वसंतराव देशपांडे सभागृहात दिनांक 7 जुलै ला सायंकाळी 7 वाजता आयुष्यावर बोलू काही असा संगीतमय कार्यक्रम चे आयोजन आहे या साठी Bookmy show या वर तिकीट बुकिंग करता येईल गत 20 वर्षांपासून या कार्यक्रम चे आयोजन सुरू आहे रसिकांनी आनंद घ्यावा ही विनंती आयोजक नि केली आहे

नागपूर - आयुष्यावर बोलू काही सदाबहार कार्यक्रमाला वीस वर्षे पूर्ण होत आहे महाराष्ट्रभर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतो हा कार्यक्रम दि 7 जुलै ला नागपूर, 8 जुलै अमरावती 9 जुलै चंद्रपूर असा विदर्भ दौरा करतो आहे.या सगळ्या कार्यक्रमाची तिकिटं Bookmyshow या ऍप वर आहे . विदर्भातील या कार्यक्रमाचे प्रायोजक आरिष इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे श्री प्रशांत काळी व श्री कुणाल नरसापूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. आरिष इन्फ्रास्ट्रक्चर ही नागपुरातील गृहप्रकल्प बांधकाम व्यवसायातील अग्रणी कंपनी आहे ग्राहकांना दर्जेदार उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहे. सध्या या कंपनीचे बेसा नागपूर येथे मोठे टाऊनशिप प्रकल्प चालू आहे. आयष्यावर बोलू काही यावर बोलताना डॉक्टर सलील कुलकर्णी म्हणाले, “ या कार्यक्रमाला वीस वर्ष पूर्ण होत आहेत. वीस वर्ष या कविता गाण्यांनी घराघरात मनामनात जागा निर्माण केली. त हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला कारण तो सतत बदलतो आहेया मध्ये सतत नवीन कविता गाणी चा समावेश करत आहोत. या कार्यक्रमात ५ वर्षांपासून ते जेष्ठ नागरिकांसाठी सगळ्यांसाठी काहीतरी आहे. कार्यक्रम सगळ्यांना आवडतो या कार्यक्रमाचे महाराष्ट्रात , भारतात अनेक ठिकाणी १८ देशात प्रयोग झाले आहे. या कार्यक्रमातील गाणी लोकांना तोंडपाठ आहे लहान मुलांना पाठ आहे सगळ्या पिढ्यांपर्यंत ही मराठी भाषा पोहचली आहे. स्वतंत्र रचना नवीन कविता असूनही इतकी वर्ष भरभरून दाद मिळत आहे हा महत्वाचा मुद्दा आहे.डॉक्टर सलील कुलकर्णी आवाज संगीतातून संदीप खरे लेखणीतून उतरलेल्या त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या या अविस्मरणीय कार्यक्रमाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मराठी रसिक माणसाच्या मनात या कार्यक्रमाने एक जागा निर्माण केली आहे. सामान्य माणसाचे आयुष्य या कार्यक्रमाने कवितेच्या माध्यमातून अलगदपणे उलगडले आहे. 20 वर्ष मराठी मनात घर केलेला 1700 प्रयोगाचा टप्पा पार केलेला हा कार्यक्रम चुकवू नये. हा कार्यक्रम 7 जुलै 2023 रोजी, रात्री 7 वाजता वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स, नागपूर आयोजित केला आहे. कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आव्हान आरिष इन्फ्रास्ट्रक्चर यांनी केले आहे.