नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

स्माईल ट्रेन इंडिया बजाज व फिनसर्व याच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल येथे महा स्माईल्स उपक्रम

स्माईल ट्रेन इंडिया आणि बजाज फिनसर्व CSR यांच्यातर्फे महा स्माईल्स चे विदर्भात क्लेफ्ट जनजागृती अभियान सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने समर्थित, चेहऱ्यावरील विवर (क्लेफ्ट) व तालू शस्त्रक्रियांसाठी लवकर निदान व उपचाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ९० दिवसांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

नागपूर, : देशातील अग्रगण्य क्लेफ्ट-संबंधित स्वयंसेवी संस्था स्माईल ट्रेन इंडिया बजाज फिनसर्व CSR यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील दुर्लक्षित भागांमध्ये उपचारासाठीचा दुवा निर्माण करण्याच्या उद्देशाने महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. या ९० दिवसांच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ आज नागपूर येथील स्माईल ट्रेनचे भागीदार रुग्णालय – स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल येथे डॉक्टर्स, सरकारी अधिकारी बजाज फिनसर्व व स्माईल ट्रेनच्या नेतृत्व मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमास पाठिंबा दर्शवत, विदर्भातील गरजू मुलांसाठी क्लेफ्ट उपचार सहज उपलब्ध करून देण्याचे आपले व्हिजन शेअर केले. या कार्यक्रमात एलईडी स्क्रीनने सज्ज अशा तीन व्हॅन्सना झेंडा दाखवण्यात आला, ज्या अकोला, नागपूर व वर्धा विभागातील ग्रामीण भागात फिरणार आहेत. या व्हॅन्समध्ये ऑडिओ-व्हिज्युअल साधने संवादात्मक प्लॅटफॉर्म्स असतील, ज्यामधून स्थानिक समुदायांमध्ये क्लेफ्ट म्हणजे काय त्यावर लवकर हस्तक्षेप व शस्त्रक्रियेद्वारे उपचार शक्य आहे हे समजावून सांगण्यात येईल. याशिवाय, या व्हॅन्समधून परिसरातील मोफत उपचारासाठी टोल-फ्री क्रमांक 1800 103 8301 वर संपर्क करण्याचे मार्गदर्शन दिले जाईल. दक्षिण आशियासाठी
स्माईल ट्रेनच्या एरिया डायरेक्टर रेणू मेहता म्हणाल्या,महास्माईल्स हा केवळ एक उपक्रम नसून एक समाजाभिमुख चळवळ आहे. प्रत्येक मुलाला आनंदाने हसण्याचा, स्पष्ट बोलण्याचा व्यवस्थित अन्न खाण्याचा हक्क आहे असा विश्वास आहे. बजाज फिनसर्वच्या मदतीने हा संदेश थेट लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. क्लेफ्ट लिप व पॅलेटचे उपचार शक्य आहेत हे त्यांना समजून सांगत आहोत. उद्दिष्ट म्हणजे गावतळापर्यंत जागरुकता पोहोचवून वेळेवर उपचाराची खात्री करणे. मुख्यमंत्री फडणवीसजींच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहोत नॅशनल हेल्थ मिशन, महाराष्ट्र यांच्यासोबत औपचारिक सहकार्याची अपेक्षा बाळगत आहोत, जेणेकरून विदर्भ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक क्लेफ्टग्रस्त मुलापर्यंत पोहोचता येईल. बजाज फिनसर्वचे CSR अध्यक्ष कुरुश इराणी म्हणाले, मुलांचे आरोग्य क्लेफ्ट केअरला प्राधान्य देण्यासाठी स्माईल ट्रेनसोबत महा स्माईल्स – प्रत्येक मुलासाठी क्लेफ्ट केअर हा उपक्रम सुरू केला. यामध्ये वेळेवर शस्त्रक्रियेसाठी लवकर रेफरल्स मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता हा उपक्रम विदर्भात व्हॅन जनजागृती मोहिमेद्वारे विस्तारत असून, स्थानिक उपचार केंद्रांशी पालकांना जोडण्यात येणार आहे. आम्हाला आशा आहे की, अधिकाधिक कुटुंबांना लवकर हस्तक्षेपाचे महत्त्व समजेल त्यांच्या मुलांचे आरोग्यपूर्ण, समाधानी जीवन घडेल. महा स्माईल्स मुलासाठी क्लेफ्ट केअर हा उपक्रम ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू झाला असून, २०२६ पर्यंत महाराष्ट्रात पुढील उद्दिष्ट गाठणे अपेक्षित आहे: संपूर्ण महाराष्ट्रभर ८,००० मोफत क्लेफ्ट शस्त्रक्रिया २०,०००+ आशा/आरबीएसके आरोग्य कर्मचाऱ्यांचे लवकर निदानासाठी प्रशिक्षण (यापैकी १६,०००+ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण) ३६ वेबिनार सत्रांद्वारे स्त्रीरोगतज्ज्ञांचे प्रशिक्षण (यातील २२ सत्रांमध्ये ५,०००+ सहभाग) – AMOGS सहकार्याने महाराष्ट्रभर रेडिओ, बस, केबल, वृत्तपत्रांद्वारे जनजागृती मोहीम विदर्भातील या जनजागृती मोहिमेला स्माईल ट्रेनचे भागीदार रुग्णालय व क्लेफ्ट सर्जन्स यांचेही सहकार्य लाभणार आहे. त्यामध्ये डॉ. प्रणाम सदावर्ते (स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपूर), डॉ. मयूर अग्रवाल (श्रीराम हॉस्पिटल, अकोला), डॉ. नितीन भोला (आचार्य विनोबा भावे, वर्धा), डॉ. मनिंदर जांभूळकर (सहयोग हॉस्पिटल, गोंदिया) यांचा समावेश आहे, जे मोहिमेदरम्यान व त्यानंतरही सुरक्षित आणि वेळेवर शस्त्रक्रियेची सुविधा देतील. पुढील तीन महिन्यांत या व्हॅन्स विविध बाजारपेठा, आरोग्य शिबिरे स्थानिक मेळावे यामध्ये फिरून समाजात असलेल्या गैरसमज दूर करतील, उपचारासाठी मार्गदर्शन करतील हजारो कुटुंबांना नव्या आशेचा किरण देतील.