नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

एचडीएफसी बँक द्वारा 7.2 लाखांहून अधिक तरुणांना प्रशिक्षण

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त, एचडीएफसी बँक परिवर्तन च्या कौशल्य विकास उपजीविका वाढवणाऱ्या कार्यक्रमांच्या मी माध्यमातून 7.2 लाखांहून अधिक तरुणांना प्रशिक्षण

नागपूर : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त, एचडीएफसी बँकेने परिवर्तन या सीएसआर (CSR) उपक्रमा अंतर्गत देशभरातील 7.2 लाखांहून अधिक तरुणांना कुशल बनवण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला. कौशल्य विकासाच्या क्षेत्रात बँकेचे सध्या 70 हून अधिक प्रकल्प विविध राज्यांमध्ये सुरू आहेत. यामध्ये आयटी/आयटीईएस (IT/ITeS), रिटेल, आरोग्यसेवा, उत्पादन आणि कृषी यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. कौशल्य विकास करने उपजीविका वाढवणे हे बँकेच्या परिवर्तन या सीएसआर उपक्रमांच्या मुख्य कार्यक्रमाचे (अंब्रेला ब्रँड) प्रमुख उद्दिष्ट आहे. हे उपक्रम दोन प्रमुख क्षेत्रांवर काम करतात: a) रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास b) विशेषतः ग्रामीण भागांत उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन उपजीविका वाढवणे. रोजगार निर्मिती कार्यक्रमांमध्ये 3 ते 6 महिन्यांचे नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (NSQF)-आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम दिले जातात. वित्त व्यवसाय सेवा, रिटेल विक्री, आदरातिथ्य पर्यटन, आरोग्यसेवा, आयटी आयटी सक्षम सेवा, बांधकाम उत्पादन, सौंदर्य आरोग्य, वस्त्रोद्योग आणि शिक्षण प्रशिक्षण या क्षेत्रांचा समावेश आहे. या कार्यक्रमांमुळे 60 ते 70 टक्के रोजगाराची निश्चिती झाली आहे. बँकेच्या कौशल्य केंद्रांमध्ये जयपूर येथील परिवर्तन स्किल्स अकादमी चा नुकता समावेश झाला आहे. याद्वारे स्थानिकांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन शाश्वत रोजगार उद्योजकतेकडे वाटचाल होण्याची कमी दिली जाते. या अकादमीच्या माध्यमातून देशभरातील व्यापक नेटवर्कद्वारे येत्या काही वर्षांत एकूण 2 लाख तरुणांना कुशल बनवले जावे, असे एचडीएफसी बँकेचे उद्दिष्ट आहे. यासोबतच, 6 लाखांहून अधिक व्यक्तींना, ज्यात शेतकरी, बचत गट समुदाय-आधारित उद्योगांचा समावेश आहे, परिवर्तनच्या उपजीविका वाढवण्याच्या उद्योजकता उपक्रमांद्वारे लाभ झाला आहे, ज्यामुळे शाश्वत आर्थिक सहभागाला प्रोत्साहन मिळाले आहे. या उपक्रमांमधून विकसित केलेल्या कौशल्यांमध्ये शेळीपालन, मधमाशीपालन, हातमाग विणकाम, मशरूम लागवड, गांडूळ खत निर्मिती आणि सेंद्रिय शेती यांचा समावेश आहे. एचडीएफसी बँक परिवर्तन चे कौशल्य उपक्रम अनेक राज्यांमधील शहरी ग्रामीण भागात विस्तारलेले आहेत. यात आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, महाराष्ट्र, मिझोराम, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
कौशल्य विकासातील बँकेचे प्रयत्न विविध पार्श्वभूमी असलेल्या तरुणांचा सर्वसमावेशक विकास आर्थिक सक्षमीकरणाला बळकटी देतात. 4,300 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण दिल्याने बँकेचा सर्वसमावेशक दृष्टिकोन दिसून येतो. कौशल्य प्रशिक्षणा सोबतच, एचडीएफसी बँक परिवर्तन हा उपक्रम तरुणांमध्ये नूतनाविष्कार आणि उद्योजकता वाढवण्यासाठी युवा उद्योजकता स्पर्धांचे आयोजन करण्याच्या तयारीत आहे. हे प्रयत्न संयुक्त राष्ट्र (United Nations) शाश्वत विकास उद्दिष्टांशी (Sustainable Development Goals) जुळणारे आहेत, ज्यात योग्य कार्य आर्थिक वाढ, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता हवामान कृती यांचा समावेश आहे. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक युवा कौशल्य दिनाची सुरुवात केली होती. या माध्यमातून शाश्वत विकासाला पुढे नेण्याकरिता तरुणांना रोजगार उद्योग पूरक कौशल्यांनी सज्ज करण्याच्या महत्त्वावर भर दिला जातो