नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस निदान व उपचार

जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस निदान आणि उपचार पालकांसाठी मार्गदर्शिका डॉ. कृष्णा ठकरानी, सल्लागार बालरोगतज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस म्हणजे काय? जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस (जेआयए) हा 16 वर्षांखालील मुलांमध्ये होणारा एक गंभीर आणि दीर्घकालीन ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये सांध्यांमध्ये सूज येते. हा फक्त शारीरिक वाढीमुळे होणारी दुखणी नसून एक गंभीर आजार आहे

नागपूर: जुवेनाईल इडिओपॅथिक आर्थरायटिस म्हणजे काय जुवेनाइल इडिओपॅथिक आर्थरायटिस (जेआयए) हा 16 वर्षांखालील मुलांमध्ये होणारा गंभीर आणि दीर्घकालीन ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये सांध्यांमध्ये सूज येते. हा फक्त शारीरिक वाढीमुळे होणारी दुखणी नसून एक गंभीर आजार आहे मुलांच्या शारीरिक वाढीवर, विकासावर संपूर्ण जीवनमानावर परिणाम करू शकतो. वोक्हार्ट हॉस्पिटल ⁰ नागपूर येथे बालरोगतज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करत असताना, मला अनेकदा असे पालक भेटतात जे मुलांच्या सांधेदुखीला फारसं गंभीर समजत नाहीत. पण खरंतर मुलांच्या सांधेदुखीमागे एखादा ऑटोइम्यून आजार असू शकतो. या आजाराची सुरुवातीची लक्षणे लवकर ओळखल्यासवेळीच उपचार करून मुलाचे आयुष्य बदलू शकते.
सतत सांधेदुखी, सुज, किंवा हालचालींमध्ये ताठरपणा सकाळी उठल्यावर सांधांमध्ये जास्त ताठरपणा, जो दिवसभरात कमी होतो कोणताही अपघात न होता पाय लंगडत चालणं वारंवार ताप येणे, अज्ञात कारणाने अंगावर पुरळ येणे किंवा सतत थकवा जाणवणे डोळे लालसर किंवा सूजलेले असणे (युव्हीआयटिसचे लक्षण असू शकते) ही लक्षणं कधी-कधी येतात जातात, त्यामुळे निदान करणे कठीण ठरू शकते. पण पालकांनी जागरूक राहिल्यास लवकर उपचार सुरू करता येतात परिणामही चांगले मिळू शकतात. सामान्य गैरसमज वस्तुस्थिती: ही फक्त शारीरिक वाढीमुळे होणारी दुखणी आहेत. तथ्य: जेआयए ही फक्त वाढीची दुखणी नाही. हा एक प्रतिकारशक्तीशी संबंधित (ऑटोइम्यून) आजार आहे, ज्यासाठी वैद्यकीय उपचार नियमित देखरेख आवश्यक असते. मुलं मोठी झाली की आपोआप बरी होतील. तथ्य: कधी-कधी काही मुलांमध्ये लक्षणं कमी होऊ शकतात, पण बहुतेक वेळा या आजारासाठी दीर्घकालीन उपचारांची गरज असते. वेळीच उपचार केल्यास सांध्यांचं नुकसान भविष्यातील गुंतागुंत टाळता येतात. थंडीमुळे किंवा जास्त खेळल्यामुळे हा आजार होतो. जेआयए थंडी, हवामान किंवा शारीरिक हालचालींमुळे होत नाही. हा आजार तेव्हा होतो जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती चुकून स्वतःच्या सांध्यांवर हल्ला करते. वेळीच निदान का महत्त्वाचं आहे: वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये लवकर तपासणी आणि निदानाला प्राधान्य देतो. योग्य औषधोपचार, नियमित फॉलोअप फिजिओथेरपीच्या मदतीने आपण हे करू शकतो सांध्यांची सूज नुकसान कमी करू शकतो हालचाल सुधारू शकतो आणि दैनंदिन कामे सोपी करू शकतो भविष्यातील अपंगत्व टाळू शकतो मुलांना एक सक्रिय आनंदी जीवन जगायला मदत करू शकतो लवकर निदान केवळ उपचाराची दिशा बदलत नाही, तर मुलाच्या मानसिक सामाजिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करतो. एक पालक म्हणून आपण काय करू शकता लक्षणं ओळखा जर त्रास कायम दिसत असेल तर ताबडतोब बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.जागरूकता वाढवा या आजाराबद्दल शिक्षक, नातेवाईक आणि खेळाचे प्रशिक्षक यांना माहिती द्या. हा आजार असलेली मुलं नेहमी आजारी दिसत नाहीत, पण त्यांना दररोज वेदना आणि थकवा जाणवत असतो, हे लक्षात ठेवा. संशोधन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आशेचा किरण वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आता नवीन बायोलॉजिकल औषधांमुळे जेआयए मुळे होणारी सूज थेट नियंत्रित करता येते. प्रत्येक मुलासाठी खास वैयक्तिक उपचार योजना बालरोग तज्ज्ञांकडून नियमित तपासणी घेतल्यास, बहुतांश मुले शिक्षण, खेळ छंद यांचा आनंद कोणतीही अडचण न येता घेऊ शकतात. वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर येथे बालरोग विभागातील तज्ज्ञांची विशेष टीम आहे, ज्यामध्ये पेडियाट्रिक रूमॅटोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट चाइल्ड सायकॉलॉजीस्ट यांचा समावेश आहे. ही प्रत्येक जेआयए ग्र टीव्हीजीस्त मुलाला केवळ उपचारच देत नाही, तर त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण मदत मार्गदर्शन मिळेल याची खात्री देते.