नागपूर, ;
चंद्रपूरच्या 53 वर्षीय महिलेला गंभीर स्थितीत वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. छातीत मोठा ट्युमर आढळून आला होता जो श्वासनलिका (ट्रॅकिया)वर दाब देत होता, फुफ्फुस पूर्णपणे बंद झाले होते दुसरे जवळपास पूर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत होते. महिला 10 दिवसांपासून तीव्र श्वास घेण्यास त्रास, खोकला व छातीत दुखणे यासारख्या त्रासांनी पीडित होती. तिची प्रकृती 2 जून 2025 रोजी अधिकच बिघडली. सुरुवातीला वरोरा येथील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिच्या डाव्या वोकल कॉर्डचे पक्षाघात झाले असल्याचे निदान झाले. तिचा श्वास घेण्याचा त्रास झपाट्याने वाढल्यामुळे इंट्युबेट करून तातडीने वॉकहार्ट हॉस्पिटल, नागपूर येथे हलवण्यात आले.
वोक्हार्ट येथे तपासणी दरम्यान, सीटी स्कॅन डायग्नोस्टिक ब्रॉन्कोस्कोपी करण्यात आली, ज्यामध्ये छातीच्या मध्यभागी (मीडियास्टिनममध्ये) गाठ आढळून आली
श्वसनमार्गावर दाब टाकत होती. यामुळे श्वासनलिका जवळजवळ पूर्णतः बंद झाली होती उ जव्या मुख्य ब्रॉन्कसचा मार्ग पूर्णतः बंद झाल्यामुळे फुफ्फुस कोलमडले होते हवा अडकली होती. डाव्या ब्रॉन्कसचाही मार्ग जवळजवळ पूर्ण बंद झालेला होता.
परिस्थिती नाजूक असल्यामुळे गुंतागुंतीची व उच्च जोखमीची शस्त्रक्रिया नियोजित करून यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. ही शस्त्रक्रिया ईसीएमओ तज्ञ डॉ. चेतन शर्मा, डॉ. राहुल हिवांज, डॉ. सुमित नारंग, डॉ. समीर अर्बट (इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट), डॉ. अवंतिका जयस्वाल, ऍनेस्थेटिस्ट, डॉ. बारोकर, डॉ. विजया लांजे डॉ. बेलेकर यांच्या नेतृत्वाखालील बहुवैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली.
5 जून 2025 रोजी रुग्णावर रिजिड ब्रॉन्कोस्कोपिक क्रायोबायॉप्सी इलेक्ट्रोकॉटरीद्वारे ट्युमर काढण्याची यशस्वी प्रक्रिया पार पडली. श्वसनमार्ग खुला राहावा म्हणून Y-आकाराचा एअरवे स्टेंट बसवण्यात आला. ही शस्त्रक्रिया VV-ECMO सपोर्ट (फुफ्फुसांना आधार देणारी विशेष तंत्रज्ञान) यांत्रिक व्हेंटिलेशनच्या सहाय्याने पार पाडण्यात आली, कारण शस्त्रक्रियेच्या दरम्यान रक्तस्राव होण्याची श्वासनलिका कोसळण्याचा धोका मोठा होता.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली रक्तस्राव प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यात आला. रुग्णाला आयसीयूमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले पुनर्प्राप्तीसाठी रक्त चढविणे व औषधोपचार देण्यात आले.. 7 जून रोजी करण्यात आलेल्या फॉलोअप ब्रॉन्कोस्कोपीमध्ये दोन्ही श्वसनमार्ग खुले असल्याचे स्पष्ट झाले रुग्णाने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
डॉ. समीर अर्बट यांनी सांगितले की, ही दुर्मिळ जीवघेणी केस होती. वेळीच केलेली आधुनिक ब्रॉन्कोस्कोपी प्रक्रिया ECMO सपोर्टमुळे रुग्णाचे प्राण वाचवता आले. त्यांनी या यशस्वी उपचारामागे असलेल्या संपूर्ण जी वैद्यकीय टीमच्या उत्कृष्ट समन्वय कौशल्याचे विशेष कौतुक केले.
सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून कॅन्सरसाठी पुढील वैद्यकीय उपचार घेत आहे.
ही केस वेळेवर निदान, प्रगत पल्मोनोलॉजी प्रक्रिया काळजीपूर्वक क्रिटिकल केअर उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करते जे अशा आपत्कालीन प्रसंगात जीव वाचवण्यास महत्त्वाचे ठरतात.