नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

महाराष्ट्र दिना निमित्य आरोग्य तपासणी शिबिराचे समापन

महाराष्ट्र दिनानिमित्त व स्व मनोहरराव विठ्ठलराव खंदाडे छत्रपती शिवाजी जन्मोत्सव सोहळा समीती स्वागतनगर न्यू नरसाळा द्वारा भव्य 2 दिवसीय आरोग्य शिबिर व आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवसेना उबाठा चे तरुण तडफदार नेते श्रीकांत खंदाडे यांनी अथक परिश्रम घेऊन आयोजित केले जनसेवेसाठी ते सातत्याने विविध लोक सेवेचे उपक्रम राबवित असतात त्याच्या जनसंपर्क कार्यालयात नेहमी गर्दी असते

नागपूर: छत्रपती शिवाजी जन्मोत्सव सोहळा समीती स्वागतनगर न्यू नरसाळा तर्फे महाराष्ट्र दिन निमित्त आरोग्य तपासणी नेत्र तपासनी व दोन दिवसीय आधार कार्ड अपडेशन शिबिर एस के फिटनेस जिम स्वागतनगर येथे श्रीकांत खंदाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय आयोजित करण्यात आले. त्यावेळी भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था चे नेत्र चिकित्सक व गायकवाड हास्पिटल चे स्पेशालिस्ट डॉक्टर व इतर टिम तसेच सामाजिक कार्यकर्ते याचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबिरात परिसरातील शैकडो महिला पुरुष वृद्धांनी नेत्र तपासनी, आरोग्य तपासणी, दंत कान तपासणी व आधार शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे नियोजन करण्याकरिता डॉ संजय लहाने डॉ मंजिरे रविंद्र ठाकुर श्रीकांत खंदाडे महादेवजी कुहिटे सुनिल भातकूले स्वप्नील गांगुलवार सुधीर भातकूले महादेवजी कुहिटे, दिनकर राऊत सुनिल भातकूले, श्रीकांत खंदाडे स्वप्निल गांगुलवार दिपक मुळे,सिद्धुजी कोमजवार, सुधीर भातकूले, रोषण सायवानकर,अभिनव श्रीराव राहुल चन्ने, आदित्य लोखंडे संजय पाटील, रोहण तरवटकर, शुभम लखपती,अक्षय हरडे, गिरीश दाभाडे, हेमंत वाघ शुभम बालपांडे, काश्मी उकुंडे, शुभम आस्कर यांनी परिश्रम घेतले.