नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

पंडित रोणू मजुमदार यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान

पंडित रोणू मजुमदार यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्रीव प्रदान मजुमदार यांनी हा पुरस्कार संपूर्ण भारताला, त्यांचे गुरु आई-वडिलांना केला समर्पित,या पुरस्काराने मला संगीत क्षेत्रात आणखी कठोर परिश्रम करण्याचे बळ - पंडित मजुमदार

नागपूर: पंडित रोणू मजुमदार यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री प्रदान मजुमदार हा पुरस्कार भारताला, त्यांचे गुरु आई-वडिलांना केला समर्पित,पुरस्काराने संगीत क्षेत्रात आणखी कठोर परिश्रम करण्याचे बळ मिळाले आहे प्रख्यात बासरीवादक पंडित रोणू मजुमदार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी २८ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रपती भवन येथील एका भव्य समारंभात पद्मश्री पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पंडित मजुमदार यांनी देशातील तिसऱ्या क्रमांकाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार संपूर्ण देशाला, आई-वडील गुरूंना समर्पित केला. पद्मश्री या सर्वोच्च मनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी आयुष्याच्या या वळणावर भावूक त्याचवेळी आनंदीही आहे. पुरस्कार देशाला, संगीताच्या या क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो. हा पुरस्कार आईच्या पायावर समर्पित करायचा आहे. या पुरस्काराने तिच्या डोळ्यात आनंदाश्रु तराळले होते. हा पुरस्कार माझ्या गुरूंना म्हणजे भारतरत्न रवी शंकरजी, माझे गुरु पंडित विजय राघव राव माझे प्रथम गृरू व वडील भानू मजुमदारजी यांना समर्पित करतो,असे उद्गार पंडित मजुमदार यांनी पुरस्कार काढले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,गृहमंत्री अमितभाई शाह यांचेही आभार मानतो. या क्षेत्रात गेली ५० वर्षे मी जे योगदान दिले त्याची दखल घेतली. आज पहलगाममध्ये घटना घडली आहे, पार्श्वभूमीवर आजचा हा क्षण काही मोठ्या प्रमाणावर साजरा करणार नाही. या घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे
त्यांनी पत्नी आनंदी दोन्ही मुले सिद्धार्थ व हृषीकेश यांचेही आभार मानले. कुटुंबीय माझ्या कठीण काळात बाजूने ढाल बनून उभे राहिले आणि त्यांनी मानसिक आधार दिला, ते म्हणाले.पंडित मजुमदार बासरी वादनाच्या क्षेत्रात जे योगदान गेली पाच दशके दिले त्याची पोचपावती हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराने मला अधिक कठोर मेहनत करण्याचे बळ दिले आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी टॉनिक असून त्यातून मला माझ्या सांगीतिक क्षेत्रात काम करण्यासाठी अधिक बळ मिळणार आहे.मजूमदार मध्य प्रदेशातील ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यावर जानेवारी महिन्यात ५४६ संगीतकारांचा अपूर्व सिंफनी आयोजित करून इतिहास रचला आहे. या अद्वितीय सादरीकरणासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सिंफनीद्वारे सादर झालेले संगीत म्हणून मान्यता देत विक्रम नोंदवला आहे. या सिम्फनीमध्ये एकाच रचनेचे सादरीकरण करण्यात आले.हा पुरस्कार मिळाला आहे. पंडित रोणू मजुमदार हे बासरीवरील त हुकुमतीसाठी ओळखले जातात. भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणे त्यात नाविन्यपूर्णता आणणे यासाठीही रोणू मजुमदार संगीत क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. गेली कित्येक वर्षे त्यांनी संगीत क्षेत्रात जे योगदान दिले त्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कार सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. पंडित रोणू मजुमदार यांची भारतीय शास्त्रीय संगीतातील सांगितीक कारकीर्द त्यांचे वडिल डॉ. भानू मजूमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. नंतर दिवंगत पंडित लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले प्रख्यात पंडित विजय राघव राव यांच्या मार्गदर्शनाखाली फुलली. मैहर घराण्याशी असलेल्या सखोल नात्यामुळे त्यांनी लहान वयातच बासरीत प्रावीण्य मिळवले भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. नव्या जमान्याच्या संगीताच्या तसेच पारंपारिक संगीताच्या क्षेत्रात कल्पकता दाखवणाऱ्या मजूमदार यांनी केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक संगीत क्षेत्रातही स्वतःचा ठसा उमटवला आहे. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार गौरव मिळाले आहेत. त्यांमध्ये संगीत नाटक अकादमी, आदित्य विक्रम बिर्ला पुरस्कार आणि सहारा इंडिया लाईफटाईम अॅचिव्हमेंट पुरस्कार यांचा समावेश आहे. संगीत क्षेत्रात त्यांच्या योगदानाचा परिचय त्यांच्या महत्त्वपूर्ण अल्बमच्या माध्यमातून होतो. त्यांमध्ये ट्ॅव्हेलर्स टेल, कोई अकेला कहाँ, फॅसीनोमा, एटर्नल राइम्स यांचा समावेश आहे. प्रायमरी कलर्स’ हा हॉलीवूडपट जागतिक स्तरावरील आघाडीचे कलाकार जॉर्ज हॅरीसन राय कुडर यांच्याबरोबरचे त्यांचे कामही जागतिक स्तरावर मान्यता पावले आहे.