नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

महात्मा जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य वाटोडा परिसरात भीम पहाट

महात्मा जोतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती दरवर्षी या परिसरात मोठ्या उत्साहात वाटोडा बुद्ध विहार समिती द्वारा साजरी होत असते यंदा मात्र भीम पहाट मधुर भीम गीताचा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला कमलाकर मेश्राम निरंजन दहीवले याच्या अथक परिश्रमाने भीम पहाट यशस्वी झाली उपासक उपासकिनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गायक कलाकार शिलवंत सोनटक्के व त्याच्या संच नी भीम गीताचे सादरीकरण केले

नागपूर: महात्मा ज्योतिबा फुले डॉ आंबेडकर जयंती निमित्य वाटोडा बुद्ध विहार समिती द्वारा भीम पहाट भीम गीताचा मधुर संगीतमय कार्यक्रम 11 एप्रिल 25 ला पहाटे 5 वाजता प्रारंभ झाला भल्या पहाटे चाहत्यांची गर्दी जमली होती शिलवंत सोनटक्के व त्याच्या संच नी भीम बुद्ध गीतांनी मंत्रमुग्ध केले सर्व वातावरण आंबेडकरमय झाले होते महात्मा ज्योतिबा फुले व डॉ आंबेडकर यांना भंतेजी सामाजिक कार्यकर्ता रुपेश बांगडे कमलाकर मेश्राम निरंजन दहिवले यांनी पुष्पमाला अर्पण करून वंदन केले डॉ आंबेडकर याचा उद घोष करण्यात आला एक आगळा वेगळा भीम पहाट कार्यक्रम समाज प्रबोधन साठी पार पडला गायक शील सोनटक्के यांनी गाणे गायले नाही तर त्यांनी या माध्यमातून डॉ आंबेडकर यांच्या विचाराचे प्रबोधन केले संपूर्ण परिसर आंबेडकरं मय झाला असे चित्र निर्माण झाले होते त्याच्या आवाजात आणि प्रबोधन करण्यात एक वेगळी जादू आहे दर्शक मंत्र मुग्ध झाले होते डॉ आंबेडकर याचा जय घोष होत होता
आजची परिस्थितीला अनुसरून भीम बुद्ध गीत सादरीकरण केले बिहार बुद्ध विहार बाबत गीत माध्यमातून बौध्द उपासक उपासिका ना जागरूक करण्यात आले असे अनेक सामाजिक विषयावर ज्वलंत सामाजिक समस्यावर त्यांनी सादरीकरण अतिशय मार्मिक रित्या केले व एकदरीत भीम पहाट हा भीम गीताचा कार्यक्रम त्यांनी व वाटोडा बुद्ध विहार समिती ने यशस्वी केला कमलाकर मेश्राम निरंजन दहिवले व महिला नी सक्रिय सहभाग घेतला व एक आगळी वेगळी भीम पहाट या परिसरात पार पडली