नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

गल्फसिंत्रॅक इंडिया बाइक वीक २०२३ यांच्यातर्फे नागपूरमध्ये चाय- पकोडा राइड्सची मजा

इंडिया बाइक वीकची दहाव्या आवृत्ती भारतातील मोटरसायकलिंग संस्कृतीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. चाय- पकोडा राइड्स ही इंडिया बाइक वीकमधली लोकप्रिय राइड आहे. यामध्ये रायडर्सना भारतातील निसर्गसौंदर्य अनुभवत चहा- भजीचा आस्वाद घेण्याची संधी मिळते.

नागपूर, - गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेड ल्युब्रिकंट्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीला नागपूरमध्ये चाय- पकोडा’ राइड होत आहे. राइड आशियातील प्रीमि मोटरसायकलिंग फेस्टिव्हल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया बाइक वीकमधली सर्वात लोकप्रिय परंपरा आहे दहाव्या आवृत्तीची सुरुवात होत आहे. आयबीडब्ल्यूने चाय पकोडा राइडची सुरुवात केली आहे बहुप्रतीक्षीत मोटरसायकल साहस, उत्सव संस्कृतीमय कार्यक्रमाचा आरंभ केला. नागपूर चाय- पकोडा ब्रेकफास्ट राइड मध्ये 1160 उत्साही सहभागी झाले होते. वेगवेगळी पार्श्वभूमी बाइक्स असलेल्या या रायडर्सकडे भव्य हार्लेजपासून चपळ केटीएम आणि यामाहाचा समावेश होता. भारत पेट्रोलियम, ३३२३+डब्ल्यूजीएम, चंद्रपूर- नागपूर रस्ता, नागपूर एकत्र जमून हिंगणघाटातील सेलिब्रेशन्स अँड रिसॉर्टपर्यंतच्या ६१ किलोमीटर्सच्या थरारक प्रवासाची सुरुवात करण्यात आली. चंद्रपूर यवतमाळ येथेही चाय- पकोडा राइड्स आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात रायडर्सनी या शहरापासून प्रवासाची सुरुवात करत पुढे अंतिम ठिकाणी नागपूरच्या रायडर्सबरोबर सहभागी झाले. सर्वांनी एकत्रितपणे बायकिंग कम्युनिटी सेलिब्रेशनचा आनंद घेतला. उपक्रमादरम्यान सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले. रस्त्यावर उतरण्यापूर्वी सर्व नोंदणीकृत बायकर्ससाठी बंधनकारक सुरक्षित रायडिं सत्राचे आयोजन करण्यात आले होते. राइडमध्ये आयबीडब्ल्यू मार्शल्सनी सहभागी होत सर्वांचा प्रवास एकत्रित व सुरक्षित पद्धतीने होईल याची काळजी घेतली. रायडर्ससाठी हेल्मेट्स आणि शूज बंधनकारक होते व दृश्यमानता वाढवण्यासाठी गल्फतर्फे फ्लोरोसेंट जॅकेट्स पुरवण्यात आली. राइडदरम्यान वैद्यकीय गरज लागल्यास रूग्णवाहिकाही सोबत ठेवण्यात आली होती. अंतिम टप्प्यावर सहभागींनी साहसी उपक्रमांमध्ये भाग घेतला व त्यात पुश- अप आणि बर्पी चॅलेंजसारख्या मजेदार उपक्रमांचाही समावेश होता. गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लि. च्या विपणन विभागाचे प्रमुख श्री. अमित घेजी यांनी प्रसिद्ध चाय- पकोडा राइड्सचा एक भाग असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, या राइड्स मोटरसायकलिंग कम्युनिटीच्या उत्साहाचे, त्यांच्यातील जिव्हाळ्याचे प्रवासाच्या आवडीचे प्रतीक आहेत. देशभरातील मोटरसायकल प्रेमींचा रायडिंगचा अनुभव उंचावण्यासाठी गल्फ बांधील आहे . रायडर्सना पाठिंबा देणे, प्रेरणा देणे बायकिंगच्या पॅशनचा आनंद घेताना त्यांना सुरक्षित ठेवणे उद्दिष्ट आहे. हे सहकार्य हीच बांधिलकी दर्शवणारे आहे
इंडिया बाइक वीकची दहाव्या आवृत्ती भारतातील मोटरसायकलिंग संस्कृतीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. चाय- पकोडा राइड्स ही इंडिया बाइक वीकमधली लोकप्रिय राइड आहे. यामध्ये रायडर्सना भारतातील निसर्गसौंदर्य अनुभवत चहा- भजीचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. दीर्घकाळापासून गल्फ मोटरसायकलिंग कम्युनिटीला सेवा देण्यासाठी कार्यरत आहे. कंपनीने कायमच मोटरसायकलप्रेमींना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार ल्युब्रिकंट्स पुरवली आहेत. इंडिया बाइक वीकशी सहकार्याने पॅशनेट बायकर्सना मोटरसायकलिंगचा अनोखा अनुभव देण्यासाठी गल्फ उत्सुक आहे.