नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

आदित्य बिर्ला ग्रुप ब्रँड इंद्रिया नागपूरात स्टोअर चे उद्घघाटन

आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाने नागपूरमधील नवीन स्टोअरसह महाराष्ट्रातील हे स्टोअर शहरातील प्रमुख व्यावसायिक केंद्र मनिष नगर येथे स्थित आहे इंद्रियाने नागपूरमध्‍ये पहिले स्टोअर सुरू केले आहे, जे महाराष्ट्रातील स्थान मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे 32 हजार डिझाइन सह इंद्रिया बाजारपेठ काबीज करण्या च्या प्रयत्नात आहे

नागपुर: आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाने नागपूरमधील नवीन स्टोअरसह महाराष्ट्रातील आपली हे स्टोअर शहरातील प्रमुख व्यावसायिक केंद्र मनिष नगर येथे स्थित आहे इंद्रियाने नागपूरमध्‍ये पहिले स्टोअर सुरू केले आहे, जे महाराष्ट्रातील स्थान मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. हे विस्‍तारीकरण संघटित ज्वेलरी रिटेलची वाढती मागणी असलेल्या वेगाने विकसित होणाऱ्या द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्ये उपस्थिती वाढवण्‍याच्‍या ब्रँडच्या धोरणाचा भाग आहे. शहरातील प्रसिद्ध रिटेल केंद्र मनिष नगर येथे हे स्टोअर मोक्याच्या ठिकाणी स्थित आहे. ग्राहकांना सुसंस्कृत सुलभ खरेदीचा अनुभव देण्यासाठी हे स्‍टोअर डिझाइन करण्‍यात आले आहे. या स्टोअरमध्ये लग्नसराई, सण-उत्सव, समकालीन दैनंदिन वापरासाठी वजनाने हलक्या दागिन्यांच्या ३२,००० हून अधिक डिझाइन्स उपलब्ध आहेत
खास कारागिरीसाठी स्वतंत्र रूम डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे दागिन्यांमधील कसब ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध होईल. डिझाइनमधील उत्कृष्टता, वैविध्यपूर्ण श्रेणी ग्राहक-केंद्रित सेवा यांवर विशेष भर देणारे हे स्टोअर ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. हे लाँच पश्चिम भारतामध्ये इंद्रियाचे स्थान अधिक दृढ करण्यासोबत उदयोन्मुख शहरी बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. याप्रसंगी मत व्‍यक्त करत इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले, संघटित ज्वेलरी रिटेलला मिळणारी वाढती पसंती पाहता महाराष्ट्र हे नेहमी प्रमुख केंद्र राहिले आहे. नागपूर शहर हे आधुनिकतेचा अनोखा संगम आहे, येथे विकासाची मोठी क्षमता आहे. या स्टोअरच्या माध्यमातून आमच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्स खरेदीचा उच्‍च दर्जाचा अनुभव या भागातील ग्राहकांना देण्याचा मनसुबा आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचा ब्रँड इंद्रिया नागपूरमधील या नवीन स्टोअरसह महाराष्ट्रातील विस्तार सुरूच ठेवत आहे. यामुळे या प्रदेशातील आपली पकड मजबूत करण्‍यासह आधुनिक दागिन्यांचे कलेक्शन खरेदीचा अनुभव ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्याचे ब्रँडचे ध्येय आहे.