नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

डोंबिवली मध्ये महाकाय दीडशे फुटांची गुढी. ; रवींद्र चव्हाण

डोंबिवलीतील शोभायात्रेत यावर्षी दोन ठळक गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले वंदे मातरम् या राष्ट्रगानाचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी (१५०वे) वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी (१००वे) वर्ष यावर आधारित डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने २ चित्ररथ साकारले होते. हे चित्ररथ यंदाच्या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

मुंबई: गुढी पाडव्यानिमित्त डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत एक खास आकर्षण ठरले ते नेहरू मैदानात उभारलेली महाकाय दीडशे फुटांची गुढी विशाल हिंदुत्व भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभारली आहे - रविंद्र चव्हाण, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेचे यंदाचे २८ वे वर्ष होते. हिंदू संस्कृतीच्या नव्या वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी तरुण पिढीला भारतीय संस्कृतीशी नाते टिकवून ठेवावे या उद्देशाने ही संकल्पना सांस्कृतिक डोंबिवलीत शहरातून श्री गणेश मंदिर संस्थानाच्या माध्यमातून सुरु झाली याचा एक डोंबिवलीकर म्हणून कायमच अभिमान वाटतो, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. या संकल्पनेचे श्रेय आबासाहेब पटवारी सुधीर जोगळेकर या भाजपा संघ परिवारातील डोंबिवलीकरांना असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या वर्षीचे अजून एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे नेहरू मैदानात उभारलेली महाकाय दीडशे फुटांची गुढी. विशाल हिंदुत्व भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही महाकाय गुढी डौलाने उभारल्याचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
त्याच बरोबर डोंबिवलीतील शोभायात्रेत यावर्षी दोन ठळक गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले वंदे मातरम् या राष्ट्रगानाचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी (१५०वे) वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी (१००वे) वर्ष यावर आधारित डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने २ चित्ररथ साकारले होते. हे चित्ररथ यंदाच्या स्वागतयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. यामुळे यंदाच्या स्वागतयात्रेत डोंबिवलीच्या सांस्कृतिक संचितासोबतच राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेचेही दर्शन घडले. हा दुर्मिळ असा दुग्ध शर्करा योग आल्याने यंदा डोंबिवलीकर परिवाराने याच राष्ट्रीयत्वाच्या विषयाला अनुसरून चित्ररथ साकारले. वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव रास्व संघाच्या पंचसूत्रीवर आधारित चित्ररथाच्या संकल्पनेला अपेक्षेनुसार डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.यंदाच्या वर्षी देशभक्तीची अनेक रूपं अशा आशयाची संकल्पना राबवली त्यास डोंबिवलीकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. क्रांतिकारी देशसेवक या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा झाली. त्यामध्ये ५ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ७५ वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत आबालवृद्धांनी सहभाग घेतला. विजेत्यास २५,००० रुपयांची रोख रक्कम देण्यात आले तर उपविजेत्यास १५,००० त्याचबरोबर अन्य पारितोषिके देण्यात आली.