नागपूर मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.सुभाष गोडघाटे-९८६०६६११६७ )

दत्ता मेघे मेडिकल कॉलेजतर्फे अत्याधुनिक कॅडॅव्हेरिक कार्यशाळेचे आयोजन

दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित ॲडवान्स नि अँड शोल्डर आर्थ्रोस्कोपी कार्यशाळेमुळे शल्यचिकित्सक नव्या तंत्रज्ञानाने सज्ज स्मिथ अँड नेफ्यू आणि दत्ता मेघे मेडिकल कॉलेजतर्फे अत्याधुनिक कॅडॅव्हेरिक कार्यशाळेचे आयोजन

नागपूर: दत्ता मेघे इंस्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर (डीयू) एसएमएचआरसीचा अविभाज्य आहे वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे नवा मापदंड प्रस्थापित करत आहे. महाविद्यालयात अंडरग्रॅज्युएट पोस्टग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रमांसोबतच आधुनिक सिम्युलेशन लॅब, सुसज्ज सेंट्रल म्युझियम आणि प्रगत कॅडॅव्हेर(शवविज्ञान) सर्जिकल स्किल्स वर्कशॉप उपलब्ध आहे. या सुविधा वैद्यकीय प्रशिक्षण वाढवण्यास मदत करतात विविध वैद्यकीय आरोग्यसंस्था यांच्यासाठी कार्यशाळा, सहकार्य एकत्रित संशोधनासाठी महत्त्वाचा स्रोत ठरतात. नुकतेच नागपूरच्या वानाडोंगरी स्थित दत्ता मेघे मेडिकल कॉलेज एका ॲडवान्स नि अँड शोल्डर कॅडॅव्हेरिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवस दिवसीय कार्यशाळेत विशेष कौशल्याची आवश्यकता असलेल्या अत्याधुनिक आणि गुंतागुंतीच्या आर्थ्रोस्कोपीक प्रक्रियांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. भारतभरातून आलेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींना या कार्यशाळेत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. ऑर्थोपेडिक स्पोर्ट्स मेडिसिन सोल्यूशन्समध्ये तज्ञ यूएसए-आधारित जागतिक वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनी स्मिथ अँड नेफ्यू सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
डीएमएमसीच्या कॅडॅव्हेरिक स्किल लॅबमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. डीएमएमसी ची उत्कृष्ट पायाभूत सुविधा, समर्पित व्यवस्थापन, कार्यक्षम टीम पाहून स्मिथ अँड नेफ्यू ने ही जागा कार्यशाळेसाठी निवडली. ही कार्यशाळा मध्य भारतातील पहिली कार्यशाळा होती,देशभरातील तज्ज्ञ नवोदित डॉक्टरांना शस्त्रक्रिया कौशल्यांना नवा आयाम देण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षणासाठी आठ तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने मार्गदर्शन केले. यात डॉ. सिद्धार्थ जैन, डॉ. मुकेश लड्डा, डॉ. आदित्य पावसकर, डॉ. सागर काकतकर, डॉ. डी.एस. भामरे, डॉ. प्रविण तित्तल, डॉ. सी.आर. सुरेश बाबू, आणि डॉ. अर्पित दवे यांचा समावेश होता. या तज्ज्ञांनी अनुभवातून क्लिष्ट अशा अत्याधुनिक आर्थ्रोस्कोपी तंत्रज्ञानासंबंधी मौल्यवान मार्गदर्शन दिले. दत्ता मेघे इंस्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर (डीयू) चे संचालक डॉ. अनुप मरार यांनी सांगितले की, या कार्यशाळेत एकूण 28 प्रतिनिधींनी आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रियेतील प्रगत तंत्रे शिकण्यास उत्साहाने सहभाग घेतला. ऑर्थोपेडिक्स विभागाचे तज्ज्ञ, डॉ. सिद्धार्थ जैन डॉ. वसंत गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्थोपेडिक्स विभागातील प्राध्यापकांनी राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांना सहभागी झालेल्या प्रतिनिधींना संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या उत्तम सुविधांची ओळख करून दिली. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या समर्पित टीमने विशेष मेहनत घेतली. या टीममध्ये डॉ. वसंत गावंडे, डॉ. कुणाल सावजी, डॉ. तेजस आपटे, डॉ. अजय नेनवानी, डॉ. अंजली बोरकर, डॉ. तृप्ती बलवीर आणि इलेक्ट्रॉनिक डाटा प्रक्रिया विभागातील विवेक यांचा समावेश होता. डॉ. ब्रिज सिंग, एसव्हीएल टीम, शरीरशास्त्र विभाग आणि डीएमएमसी व एसएमएचआरसीच्या सर्व सदस्यांचे कार्यशाळेच्या यशासाठी मोलाचे योगदान राहिले. कार्यक्रमाचे समन्वयन अलिया शफी यांनी केले. डीएमसीसीचे अधिष्ठाता डॉ. उज्ज्वल गजबे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयाची वैद्यकीय शिक्षण प्रशिक्षण प्रगत करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली. ऑर्थोपेडिक्स क्षेत्रातील तज्ज्ञांना आपल्या सर्जिकल कौशल्यांचा विकास करण्यासाठी व्यासपीठ मिळाल्यामुळे आर्थ्रोस्कोपी प्रक्रियांमध्ये अधिक सुधारणा घडवण्यास मदत झाली. या कार्यशाळेच्या यशामुळे भविष्यातील प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवा आदर्श निर्माण झाला असून, उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून संस्थेची प्रतिष्ठा अधिक दृढ होत आहे.