AROGYA

कोरोना पासून बचाव साठी मास्क वापरणे अति गरजेचे - डॉ प्रदिप दलाल

Nagpur Media News 04 Apr, 2021
कोरोना पासून बचाव साठी मास्क वापरणे अति गरजेचे - डॉ प्रदिप दलाल
नागरिकांनी लसीकरण बाबत असणारे गैरसमज दूर करावे कोणतेही साईड इफेक्ट नाही हलकासा ताप व मळमळ होऊ शकते पण त्याला घाबरून जाण्याची गरज नाही जनतेला आवाहन आहे की प्रत्येकाने स्वतःहून कोविडं लसीकरणचे 2 डोज पूर्ण करावे
नागपूर - दलाल हॉस्पिटल व पाईल्स सर्जरी सेंटर चे मुख्य संचालक डॉ प्रदीप दलाल यांचेशी थेट सवांद साधला कोरोना ची दुसरी लाट उग्र रुप धारण करीत आहे या पासून प्रत्येकाने बचाव करणे गरजेचे आहे सुजाण नागरिकांनी पूर्ण तोंड व नाक बंदिस्त राहील असा मास्क चा वापर नियमित करावा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे 3 फूट चे अंतर ठेवून सवांद साधावा नेहमी सॅनिटायझर चा अवलंब करावा हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे
हॉस्पिटलबला रुग्ण प्रवेश होताच त्याला अगोदर सॅनिटाइझ करून तापमान व ऑक्सिजन लेवल तपासले जाते संशयित असेल तर आम्ही मनपा ला सूचना देतो हॉस्पिटल दर एक तासाला सॅनिटाइझ करीत असतो कोरोना च्या दहशती मुळे हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णाची संख्या रोडावली आहे पन जनतेला आव्हान आहे की कोरोना च्या भीती मुळे इतर आजारावर दुर्लक्ष करू नये लसीकरण ची मोहीम जोरात सुरू असून प्रत्येकाने कोविडं लस टोचून घेणे गरजेचे आहे एक मात्रा नाहीं तर 28 दिवसानंतर दुसरी मात्रा घेणे गरजेचे आहे लसीकरण मुळे रोगप्रतीकार शक्ति वाढीस लागते याचा अर्थ असा नाही की लस घेतली तर कोरोना होणार नाही लस फक्त रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करणार आहे
Previous Story Next Story