गोंदिया।
दिवाळी सणानंतर गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात पारंपरिक सार्वजनिक मंडई-मेला उत्सवांना सुरुवात झाली आहे. गावागावांत आयोजित होणारे हे मंडई मेळे केवळ मनोरंजन आणि उत्सवापुरते मर्यादित नसून ग्रामीण समाजाची सांस्कृतिक परंपरा, लोककला, सामाजिक प्रबोधन आणि परस्पर बंधुभावाच्या शतकानुशतकांपासून चालत आलेल्या परंपरेचे जिवंत प्रतीक आहेत. आधुनिकतेच्या या युगातही ग्रामीण नागरिकांकडून हा सांस्कृतिक वारसा तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जतन केला जात आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. याच भावनेतून गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी नवरगाव खुर्द, दासगाव खुर्द, दासगाव बुजुर्ग, ढाकणी आणि कलारीटोला येथे आयोजित मंडई मेळा, लावणी व नाट्य कार्यक्रमांमध्ये उद्घाटक म्हणून सहभाग नोंदविला.
यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देत माता राणीकडे सर्वांच्या सुख-समृद्धी, संपन्नता, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. ते म्हणाले की, भजन, कीर्तन, शायरी, नाट्य, दंडार, तमाशा आणि प्रवचन या आपल्या प्राचीन सांस्कृतिक परंपरांचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. ज्या काळात समाजप्रबोधन, शिक्षण आणि मनोरंजनाची आधुनिक साधने उपलब्ध नव्हती, त्या काळात आपल्या पूर्वजांनी लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे तसेच समाजाला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आजही ग्रामीण भागात या परंपरांचे सातत्याने आयोजन होत असणे, हे आपल्या सांस्कृतिक मुळांची पाळेमुळे किती मजबूत आहेत, याचे द्योतक आहे.
ग्रामीण संस्कृती आणि लोककलांचा समृद्ध वारसा म्हणजे मंडई-मेला उत्सव : आमदार विनोद अग्रवाल*
दासगाव बु., ढाकणी, नवरगाव खुर्द, गर्रा, कलारीटोला बघोली, दासगाव खु. या गावांमध्ये मंडई मेळ्यांचा उत्साह; लावणी, नाट्य आणि पारंपरिक लोककलांनी बांधली रसिकांची मने, ग्रामीण संस्कृती जपण्याच्या उपक्रमाचे आमदारांकडून कौतुक*