AROGYA

चविष्ट पदार्थांसोबत आरोग्याची काळजी घेत साजरी करा दिवाळी

Nagpur Media News • 09 Nov, 2026
चविष्ट पदार्थांसोबत आरोग्याची काळजी घेत साजरी करा दिवाळी
दिवाळी हा दिव्यांचा, प्रेमाचा, कुटुंबीयांच्या भेटीगाठींचा अर्थातच स्वादिष्ट पदार्थांचा सण आहे. घरगुती चकली, करंजी, लाडू पारंपरिक मिठाई यांसारखे पदार्थ आपल्या दिवाळीच्या आनंदात गोडवा आणतात. मात्र, जेवणाच्या वेळा बदलणे, वारंवार काही ना काही खाणे, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि गरजेपेक्षा जास्त खाणे यामुळे अनेकदा पोट फुगणे, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते.
यंदाची दिवाळी केवळ ताटातील गोड पदार्थांसोबतच चांगल्या आरोग्याचा आनंद देणारी ठरू द्या. कारण सणाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण उत्साही, आनंदी आणि निरोगी असतो.
वखाण्याच्या सवयींबाबत जागरूक राहून सण साजरा करा
सणासुदीच्या काळात अनेकजण नंतर गोड पदार्थ खाता यावेत म्हणून जेवण टाळतात. ही एक सामान्य चूक आहे
नागपुर,
चविष्ट पदार्थांसोबत आरोग्याची काळजी घेत साजरी करा - स्वाती अवस्थी, सिनियर डायटीशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर
दिवाळी हा दिव्यांचा, प्रेमाचा, कुटुंबीयांच्या भेटीगाठींचा अर्थातच स्वादिष्ट पदार्थांचा सण आहे. घरगुती चकली, करंजी, लाडू पारंपरिक मिठाई यांसारखे पदार्थ आपल्या दिवाळीच्या आनंदात गोडवा आणतात. मात्र, जेवणाच्या वेळा बदलणे, वारंवार काही ना काही खाणे, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि गरजेपेक्षा जास्त खाणे यामुळे अनेकदा पोट फुगणे, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते.
यंदाची दिवाळी केवळ ताटातील गोड पदार्थांसोबतच चांगल्या आरोग्याचा आनंद देणारी ठरू द्या. कारण सणाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा आपण उत्साही, आनंदी आणि निरोगी असतो.
खाण्याच्या सवयींबाबत जागरूक राहून सण साजरा करा
सणासुदीच्या काळात अनेकजण नंतर गोड पदार्थ खाता यावेत म्हणून जेवण टाळतात. ही एक सामान्य चूक आहे. यामुळे खूप भूक लागते आणि नंतर गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते. त्यामुळे जेवणाच्या नियमित वेळा पाळा आणि संतुलित आहार घ्या. आपल्या आवडीचे सणासुदीचे पदार्थही योग्य प्रमाणात खाण्याचा आनंद घ्या.
उपलब्ध असलेले प्रत्येक पदार्थ चाखण्याऐवजी खरोखर आवडणारे गोड पदार्थ निवडा. हळूहळू खा, प्रत्येक घासाचा आनंद घ्या. खाण्यावर अनावश्यक बंधने घालण्यापेक्षा विचारपूर्वक योग्य प्रमाणात खाणे अधिक फायदेशीर ठरते.
सणासुदीच्या ताटात पौष्टिक पदार्थांचाही समावेश करा
सणासुदीचे जेवण चविष्ट असण्यासोबतच पौष्टिकही असू शकते. पारंपरिक पदार्थांसोबत भाज्या, डाळ, दही आणि प्रथिने असलेल्या इतर पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचे जेवण अधिक संतुलित होईल.
आवडीच्या फराळासोबत भाजलेले मखाणे, ढोकळा, चणा चाट घरगुती भाज्यांच्या टिक्की यांसारखे पर्यायही ठेवू शकता. यामुळे पारंपरिक चवीचा आनंद कायम ठेवत सणासुदीच्या खाण्यात वेगळेपण आणि पौष्टिकतेची भर पडेल.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथे दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन देणे हा दीर्घकाळ चांगले आरोग्य राखण्याच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग आहे.
Previous Story