UDYOJAGTA

वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्सचे पहिले पूर्ण स्वरूपातील वाशी मार्ट'नागपुरात सुरू - नितीनजी गडकरी

Nagpur Media News • 01 Nov, 2026
वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्सचे पहिले पूर्ण स्वरूपातील वाशी मार्ट'नागपुरात सुरू - नितीनजी गडकरी
वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्सचे पहिले पूर्ण स्वरूपातील वाशी मार्ट नागपुरात सुरू सौर ऊर्जा, औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी लागणारे साहित्य एकाच छताखाली नागपूर विदर्भातील सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक, EPC कंपन्या औद्योगिक ग्राहकांना अस्सल व तत्काळ उपलब्ध साहित्य मिळवून देण्यासाठी नवीन केंद्राची उभारणी.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन; हल्दीरामचे संस्थापक व अध्यक्ष शिवकिशन अग्रवाल यांची विशेष उपस्थिती.
नागपूर,
: भारतातील फास्ट मूटिंग इन्स्टिट्‌यूशनल गुड्स (FMIG) क्षेत्रातील आघाडीच्या B2B खरेदी पुरवठा भागीदारांपैकी असलेल्या वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्स लिमिटेडने नागपुरात आपल्या पहिल्या पूर्ण स्वरूपातील बाशी मार्ट चा शुभारंभ केला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या मार्टचे उद्घाटन करण्यात आले. हल्दीरामचे संस्थापक व अध्यक्ष शिवकिशन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सूरज डोडेजा तसेच कंपनीच्यानेतृत्व चमूतील अन्य सदस्य उपस्थित होते.
१७,७०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रात सुविधा

१७,७०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रात विस्तारलेल्या या केंद्रात सौर ऊर्जा, औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी लागणारे साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक, EPC कंपन्या, कारखाने, औद्योगिक प्रकल्प कार्यशाळांना अस्सल व तत्काळ उपलब्ध उत्पादने मिळावीत, या उद्देशाने ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे साहित्य खरेदीसाठी लागणारा वेळ कमी होऊन कामकाजाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.नागपूरमधील या केंद्रात वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्सच्या सौर ऊर्जा क्षेत्रातील उत्पादनांची श्रेणी कंपनीची स्थापित औद्योगिक पुरवठा व्यवस्था एकत्र आणण्यात आली आहे. यामुळे वैयक्तिक घरमालक, निवासी प्रकल्प विकासक, व्यावसायिक आस्थापना औद्योगिक ग्राहकांसाठी नागपूरसह संपूर्ण विदर्भात साहित्य खरेदीचे एकच स्थान उपलब्ध झाले आहे.

या केंद्रात कंपनीच्या सौर ऊर्जा आणि औद्योगिक व्यवसायांसाठी तीन प्रमुख सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. तळमजल्यावरील वाशी मार्टमध्ये सौर ऊर्जा औद्योगिक उत्पादने प्रत्यक्ष पाहून खरेदी करता येतील. मार्टच्या मागील बाजूस असलेल्या प्रादेशिक केंद्रात २,००० हून अधिक उत्पादनांच्या प्रकारांचा (SKU) साठा उपलब्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावरील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या साहित्याची पूर्तता केली जाईल. या सुविधेमुळे किरकोळ खरेदी, उपलब्ध साठा प्रत्यक्ष तांत्रिक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे खरेदी अधिक सुलभ

नागपूरमधील वाशी मार्ट हे कंपनीचे भौतिक डिजिटल खरेदी सुविधा एकत्रित करणारे पहिले केंद्र आहे. ग्राहकांना येथे प्रत्यक्ष उत्पादने पाहता येतील. QR कोड स्कॅन करून उत्पादनांची सविस्तर माहिती मिळवता येईल. तसेच डिजिटल कार्टमध्ये उत्पादने समाविष्ट करून DigiServe ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खरेदी पूर्ण करता येईल. या एकात्मिक व्यवस्थेमुळे प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव आणि डिजिटल सुविधांचा लाभ एकत्र मिळणार असून, उत्पादनांची माहिती मिळवणे आणि खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

विदर्भातील वाढत्या मागणीवर लक्ष केंद्रित

यावेळी बोलताना वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्स लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी मनोज शिसाळे म्हणाले, नागपुरात आमचे पहिले पूर्ण स्वरूपातील वाशी मार्ट सुरू होणे हा कंपनीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. या केंद्राच्या माध्यमातून आम्ही सौर ऊर्जा आणि औद्योगिक साहित्य पुरवठ्याची क्षमता एकाच छताखाली आणली आहे. विदर्भासाठी महत्त्वाच्या बाजारपेठेत ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे आहे.नागपूर आणि संपूर्ण विदर्भात निवासी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, व्यावसायिक आस्थापना आणि औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढत आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात विकासाच्या संधी उपलब्ध आहेत. या केंद्राच्या माध्यमातून वैयक्तिक घरमालक, निवासी प्रकल्प विकासक, सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक, व्यावसायिक आस्थापना आणि औद्योगिक ग्राहक अशा विविध ग्राहकांना सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
अस्सल तत्काळ उपलब्ध साहित्य स्थानिक पातळीवर मिळाल्यामुळे सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिक आणि प्रकल्प विकासकांना प्रकल्प पूर्ण होण्यास होणारा विलंब कमी करता येईल. तसेच औद्योगिक ग्राहकांना आवश्यक साहित्य लवकर उपलब्ध होऊन उत्पादन प्रक्रियेतील ठप्पपणा कमी करण्यास मदत होईल. नागपूरमधील हे केंद्र आमच्या एकात्मिक व्यवसाय मॉडेलच्या विस्तारातील महत्त्वाचे पाऊल आहे. विदर्भासह अन्य भागांतील ग्राहकांपर्यंत वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्सची संघटित पुरवठा व्यवस्था अधिक जवळ नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

नागपुरातील पहिल्या पूर्ण स्वरूपातील वाशी मार्टच्या शुभारंभामुळे विदर्भातील ग्राहकांसाठी अधिक सक्षम परस्परांशी जोडलेली पुरवठा व्यवस्था उभारण्याच्या दिशेने कंपनीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्सविषयी

१९७८ मध्ये स्थापन झालेली वाशी इंटिग्रेटेड सोल्युशन्स (पूर्वीची वाशी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड) ही भारतातील फास्ट मूव्हिंग इन्स्टिट्यूशनल गुड्स (FMIG) क्षेत्रातील आघाडीच्या बीटूबी खरेदी आणि पुरवठा भागीदारांपैकी एक आहे.

नवी मुंबई येथे मुख्यालय असलेली ही कंपनी DigiServe या डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित खरेदी व्यवस्थेच्या माध्यमातून औद्योगिक ऑटोमेशन, इलेक्ट्रिकल्स, ऊर्जा, पायाभूत सुविधा, उत्पादन, व्यावसायिक सौर ऊर्जा क्षेत्रांतील उत्पादने उपलब्ध करून देते.

कंपनीने आपल्या कार्यकाळात २ लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे. देशातील १२० हून अधिक शहरांमध्ये ७,५०० हून अधिक पिन कोडपर्यंत पोहोचणाऱ्या सेवा व्यवस्थेसह कंपनीची २२ हून अधिक पूर्तता केंद्रे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत.
Previous Story