नागपूर,
23 ऑक्टोबर 2026 : 2016 मध्ये 50 बेडच्या रुग्णालयापासून सुरू झालेला न्यूएरा हॉस्पिटल्सचा प्रवास आज अनेक ठिकाणी सेवा देणाऱ्या आरोग्यसेवा समूहापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारी, आधुनिक रुग्णांच्या गरजांना प्राधान्य देणारी आरोग्यसेवा देण्याचे ध्येय ठेवून रुग्णालयाने सातत्याने प्रगती केली आहे. याच प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत, न्यूएरा हॉस्पिटल्सने 23 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूरमधील वर्धमान नगर येथे 300 बेडच्या अत्याधुनिक नवीन रुग्णालयाचे उदघाटन केले.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी नागपूरमधील अनेक मान्यवर व्यक्ती, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या नवीन मुख्य रुग्णालयामुळे केवळ आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाली आहे असे नाही, तर न्यूएरा हॉस्पिटल्सच्या प्रगतीतील नवा टप्पा आहे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे नागपूर, विदर्भ तसेच मध्य भारतातील रुग्णांना विशेष व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून न्यूएरा हॉस्पिटल्सने वैद्यकीय तज्ज्ञांचे ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान रुग्णांची प्रेमाने व काळजीपूर्वक सेवा यांचा समन्वय साधणारी आरोग्यव्यवस्था उभारण्यावर भर दिला आहे. वर्धमान नगर येथील हे नवीन रुग्णालय या प्रवासातील नवे पर्व आहे. येथे प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया, अत्याधुनिक निदान सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आणि विविध विशेष वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील.
या नवीन रुग्णालयाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथे उपलब्ध असलेली प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया सुविधा. यामध्ये सिंगल-पोर्ट मल्टी-पोर्ट रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणालींचा समावेश आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, येथे भारतातील पहिले सिंगल-पोर्ट सर्जिकल रोबोट सुरू करण्यात येणार आहे. यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पूर्णपणे डिजिटल 3T एमआरआय मशीन, 256-स्लाइस सीटी स्कॅनर आणि होलॉजिक 3D मॅमोग्राफी यांसारख्या अत्याधुनिक निदान सुविधाही येथे उपलब्ध असतील. ऑपरेशन थिएटर अतिदक्षता विभागात (ICU) एआय आधारित रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा असेल. तसेच रोबोटिक फिजिओथेरपी आधुनिक पुनर्वसन सेवांचाही या रुग्णालयात समावेश करण्यात येणार आहे.
या सर्व सुविधांमधून रुग्णाच्या आजाराचे निदान करण्यापासून ते उपचार आणि पूर्णपणे बरे होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर न्यूएरा हॉस्पिटल्सचा भर दिसून येतो. वैद्यकीय तज्ज्ञांचे कौशल्य, रुग्णांची सुरक्षितता आणि प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक उपचार यांना प्राधान्य दिले जाते. रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांची काळजीवाहू व्यक्तींचीही योग्य काळजी घेण्यावर रुग्णालयाने भर दिला आहे. त्यांच्यासाठी घरासारखे आरामदायी वातावरण, उत्तम दर्जाचे जेवण आरामदायी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रसंगी न्यूएरा हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक सह-संस्थापक डॉ. आनंद संचेती म्हणाले, न्यूएरा हॉस्पिटल्सच्या प्रवासातील प्रत्येक महत्त्वाचा टप्पा हा आम्ही सेवा देत असलेल्या समाजाला दर्जेदार आरोग्यसेवा अधिक सहज उपलब्ध करून देण्याच्या ध्येयातून साकार झाला आहे. पहिल्या रुग्णालयापासून ते वर्धमान नगर येथील 300 बेडच्या या भव्य रुग्णालयापर्यंतचा प्रवास हा सातत्याने प्रगती करण्याची, नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आमची बांधिलकी दर्शवतो. हे नवीन रुग्णालय मध्य भारतातील रुग्णांना त्यांच्या जवळच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यापुढेही आधुनिक तंत्रज्ञान, वैद्यकीय तज्ज्ञांचे कौशल्य रुग्णांप्रती आपुलकीपूर्ण यांचा योग्य समन्वय साधण्यावर आमचा भर राहील
न्यूएरा हॉस्पिटल्सने वर्धमान नगर येथे 300 बेडच्या नवीन रुग्णालयाचे उद्घघाटन
न्यूएरा हॉस्पिटल्सने वर्धमान नगर येथे 300 बेडच्या नवीन रुग्णालयाचे उद्घाटन केले; आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नवा टप्पा
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि नागपूरमधील मान्यवरांच्या उपस्थितीत न्यूएरा हॉस्पिटल्सने मध्य भारतातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले.
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि नागपूरमधील मान्यवरांच्या उपस्थितीत न्यूएरा हॉस्पिटल्सने मध्य भारतातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले.