UDYOJAGTA

हातमागाला पुनर्वैभव मिळवून देण्याचे लक्ष्य : नितीन गडकरी

Nagpur Media News • 17 Oct, 2026
हातमागाला पुनर्वैभव मिळवून देण्याचे लक्ष्य : नितीन गडकरी
हातमागाला पुनर्वैभव मिळवून देण्याचे लक्ष्य : नितीन गडकरी
अभिनेत्री हेमामालिनींच्या हस्ते धापेवाडा टेक्सटाईलच्या नव्या इमारतीचे लोकार्पण
फॅशन शोमध्ये झळकल्या धापेवाडाच्या पारंपरिक साड्या
नागपूर,
: पूर्वी प्रत्येक हलबा आदिवासी समाजाच्या घरात हातमाग होता; मात्र आता ही परंपरा संपण्याच्या मार्गावर आहे. हातमागाला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी या विणकर समाजाला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी धापेवाडा टेक्सटाईल प्रकल्प सुरू करण्यात आला, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
विदर्भातील पारंपरिक हातमाग उद्योगाला आधुनिक फॅशन, डिझाईन व्यापक बाजारपेठेशी जोडण्याच्या दिशेने धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या धापेवाडा (कळमेश्वर) येथे कंपनीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण हातमाग उद्योगाचा शुभारंभ शनिवारी सुप्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.नितीन गडकरी म्हणाले, २०२१ मध्ये या कामाची सुरुवात करून महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. सुरुवाती बाजारपेठेबाबत साशंकता होती; मात्र उत्पादनाचा दर्जा सुधारल्याने मागणी वाढली आहे. उत्पादन वाढविण्यासाठी गडचिरोली आणि वाशीम जिल्ह्यांत प्रकल्प सुरू करण्यात आले असून, भविष्यात खापा येथेही प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे.
Previous Story