नागपूर : राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे यंदा 11 दिवसांचा नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात भक्तीपर कार्यक्रमांसोबत संगीत, नाटक, काव्यवाचन, नृत्य, ऐतिहासिक सादरीकरण आणि पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
11 ते 21 ऑक्टोबरदरम्यान दररोज सायंकाळी नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. या उत्सवामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील प्रसिद्ध कलाकार आणि कलावंत सहभागी होणार आहेत. यासोबतच घटस्थापना, नवचंडी यज्ञ, दसरा मिलन आणि विसर्जन यांसारखे पारंपरिक धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या कार्यक्रमात हुमसुफी बँड, द बासरीवाला कलेक्टिव्ह आणि मैथिली ठाकूर यांचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच नाटक, कविता आणि नृत्याचे विविध कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत. उत्सवाचे एक प्रमुख आकर्षण ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ हे विशेष सादरीकरण असणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान सरदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाची गाथा सादर केली जाणार आहे. पन्हाळगड ते पावनखिंड हा ऐतिहासिक प्रवास आणि स्वराज्यासाठी बाजी प्रभू देशपांडे यांनी दाखवलेले धैर्य निष्ठा आणि समर्पण या सादरीकरणातून प्रेक्षकांसमोर जिवंत केले जाणार आहे. याशिवाय ‘खाऊ गप्पा आणि कविता’ या कार्यक्रमात विष्णू मनोहर आणि मुकुंद देशपांडे सहभागी होणार आहेत. मुंबईतील सोनिया परचुरे आणि त्यांच्या टीमकडून ‘उत्तरा’ हे नृत्य सादरीकरण होणार आहे. तसेच ‘ही दोस्ती तुटायची नाय’ या कार्यक्रमात चिन्मय सुमीत, अमृता बाणे, शुभंकर एकबोटे आणि सुमीत राघवन सहभागी होणार आहेत. 18 वर्षांचा उत्सव आणि समाजसेवा 2006 मध्ये सुरू झालेले राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ आज नागपुरातील एक मोठा
राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाकडून नवरात्रोत्सवात संगीत, नाटक, नृत्य, इतिहास आणि भक्तीचा अनोखा संगम
मंडळाची सामाजिक बांधिलकी केवळ नवरात्रोत्सवापुरती मर्यादित नाही. मंडळाचे स्वयंसेवक आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रमाला मदत करतात. तसेच अनाथालयांना पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य देऊन मदत केली जाते. पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी लक्ष्मीनगर येथे कृत्रिम विसर्जन टाक्यांची व्यवस्थाही केली जाते. यामुळे नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यास मदत होते. राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले आणि त्यांच्या टीमने सांगितले की, या उत्सवाचा उद्देश संस्कृती, परंपरा, इतिहास, भक्ती आणि समाजाचा सहभाग यांना एका व्यासपीठावर आणणे हा आहे. मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या टीमकडून यंदाच्या उत्सवाची थीम, विविध कार्यक्रम तसेच उत्सवादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती माध्यमांना देण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवातील कार्यक्रम तारीख वार कार्यक्रम वेळ 11 ऑक्टोबर रविवार घटस्थापना सायं. 7:00 वा. 12 ऑक्टोबर सोमवार खाऊ गप्पा आणि कविता – विष्णू मनोहर आणि मुकुंद देशपांडे सायं. 7:00 वा. 13 ऑक्टोबर मंगळवार पन्हाळगड ते पावनखिंड – छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानावर आधारित सादरीकरण सायं. 7:00 वा. 14 ऑक्टोबर बुधवार हमसुफी बँड सायं. 7:00 वा. 15 ऑक्टोबर गुरुवार द बासुरीवाला कलेक्टिव्ह सायं. 7:00 वा. 16 ऑक्टोबर शुक्रवार ही दोस्ती तुटायची नाय – चिन्मय सुमीत, अमृता बाणे, शुभंकर एकबोटे आणि सुमीत राघवन सायं. 7:00 वा. 17 ऑक्टोबर शनिवार उत्तरा – सोनिया परचुरे आणि टीम, मुंबई सायं. 7:00 वा. 18 ऑक्टोबर रविवार भजन संध्या – मैथिली ठाकूर सायं. 7:00 वा. 19 ऑक्टोबर सोमवार नवचंडी यज्ञ आणि महाप्रसाद सकाळी 9:00 वा. 20 ऑक्टोबर मंगळवार दसरा मिलन सायं. 6:00 वा. 21 ऑक्टोबर बुधवार विसर्जन सायं. 7:00 वा.