SHAISHNIK

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च ला युजीसीची मान्यता

Nagpur Media News • 26 Sep, 2026
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च  ला युजीसीची मान्यता
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च ला युजीसीची मान्यता

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर)ला अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च हे नवीन नाव स्वीकारण्यासाठी युजीसीची मंजुरी मिळाली आहे.
स्वर्गीय श्री. दत्ताजी मेघे यांनी 1990 मध्ये या संस्थेची स्थापना केली. वैद्यकीय महाविद्यालया पासून सुरू झालेली ही संस्था आज वर्धा नागपूर येथे कॅम्पस असलेले बहुविषयक विद्यापीठ म्हणून विकसित झाली आहे. नव्या नावामुळे अदाणी फाउंडेशन आणि दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यातील सहकार्याला नवी दिशा मिळणार आहे
नागपूर (महाराष्ट्र),
: दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर), अभिमत विद्यापीठाला आता अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च असे नवीन नाव देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) कडून मंजुरी मिळाली आहे.
व्हाईस चान्सलर डॉ. ललितभूषण वाघमारे यांनी सांगितले, हा संस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या नव्या नावाने पुढे जाताना, मजबूत पायावर उभारलेली ही वाटचाल पुढे नेणार आहोत. तसेच उत्कृष्टता, नवकल्पना जागतिक स्तरावर काम करण्याच्या संधी निर्माण करणार आहोत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या संस्थेला दिशा देणारी मूल्ये उद्देश यापुढेही कामाच्या केंद्रस्थानी राहतील,दर्जेदार शिक्षण संवेदनशील आरोग्यसेवा देण्याची आमची बांधिलकी कायम राहील. विशेषतः ग्रामीण आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या समुदायांसाठी काम करण्यावर भर कायम असेल. संशोधन अधिक मजबूत करणे, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, रुग्ण समाजातील विविध घटकांसाठी अधिक संधी निर्माण करणे, यासाठी पुढे काम करू.
चीफ सर्व्हिसेस ऑफिसर (CSO) रवींद्र मेहेरे यांनीही पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शैक्षणिक उत्कृष्टता, आरोग्यसेवा, संशोधन समाजाप्रती असलेली संस्थेची बांधिलकी यावर प्रकाश टाकला.
या संस्थेची सुरुवात 1990 मध्ये महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (जेएनएमसी)च्या स्थापनेपासून झाली. संस्थेचे संस्थापक माजी कुलपती श्री. दत्ताजी मेघे यांनी ही संस्था सुरू केली. चार वेळा खासदार राहिलेले आणि विदर्भातील शिक्षण व आरोग्यसेवेसाठी दीर्घकाळ काम करणारे . मेघे यांनी या संस्थेचा वैद्यकीय महाविद्यालयापासून मल्टीडिसिप्लिनरी विद्यापीठापर्यंत विस्तार केला. आज येथे वैद्यकीय शिक्षणासोबतच दंतचिकित्सा, नर्सिंग, आयुर्वेद, फिजिओथेरपी, फार्मसी, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या क्षेत्रांमध्येही शिक्षण दिले जाते.
. दत्ताजी मेघे यांचे 22 मार्च 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. विदर्भातील शिक्षण आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांचे योगदान त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेसाठी आजही महत्त्वाचे आहे.चान्सलर डॉ. प्रीती अदाणी या संस्थेच्या या नव्या टप्प्यात नेतृत्व करत आहेत.
24 मे 2005 रोजी युजीसीने या संस्थेला अभिमत विद्यापीठ (डीम्ड-टू-बी-यूनिवर्सिटी) असा दर्जा दिला. संस्थेच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. काही वर्षांत वर्धा नागपूर येथे संस्थेने शिक्षण आरोग्यसेवेचे मोठे नेटवर्क उभारले आहे. शिक्षण, संशोधन, रुग्णसेवा सामुदायिक आरोग्य या क्षेत्रांत संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे
Previous Story