UDYOJAGTA

द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा तर्फे नागपूर मरिना प्रकल्पाचे ताबा देण्याचे काम २ वर्षे आधी पूर्णत्वास

Nagpur Media News 16 Sep, 2026
द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा तर्फे  नागपूर मरिना प्रकल्पाचे ताबा देण्याचे काम २ वर्षे आधी पूर्णत्वास
नागपूरमधील सर्वात आलिशान मालमत्तेमध्ये २ वर्षे आधी राहण्याचा आनंद घेऊ शकतील.
या प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकामाचा वेग वाढल्यामुळे हे शक्य झाले आहे. रिअल इस्टेट बांधकाम क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थिती पाहता ताबा देण्याच्या प्रक्रियेला मिळालेली ही गती विशेष उल्लेखनीय आहे.
नागपूर : रिअल इस्टेट क्षेत्रात पहिल्यांदाच घडणाऱ्या एका घडामोडीत, द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL) ने नागपूर मरिना प्रकल्पाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टप्प्याची घोषणा केली आहे. रेरा (RERA) कडे नोंदणीकृत असलेला डिसेंबर २०३० चा ताबा देण्याचा कार्यकाळ २ वर्षे आधी आणून, डिसेंबर २०२८ मध्येच प्रकल्पाचा ताबा देण्याची अभूतपूर्व घोषणा कंपनीने केली आहे. ग्राहकांसाठी याचा अर्थ असा आहे की, त्यांना मूळ नियामक मुदतीपूर्वीच भूखंडांचा (प्लॉट्स) ताबा मिळणार आहे, ज्यामुळे ते वैयक्तिक घरांचे बांधकाम सुरू करू शकतील नागपूरमधील सर्वात आलिशान मालमत्तेमध्ये २ वर्षे आधी राहण्याचा आनंद घेऊ शकतील.
या प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकामाचा वेग वाढल्यामुळे हे शक्य झाले आहे. रिअल इस्टेट बांधकाम क्षेत्रातील आव्हानात्मक परिस्थिती पाहता ताबा देण्याच्या प्रक्रियेला मिळालेली ही गती विशेष उल्लेखनीय आहे. अलीकडच्या काळात, पश्चिम आशियातील वादामुळे निर्माण झालेल्या अडचणी, विशेषतः धातूंसारख्या महत्त्वाच्या बांधकाम साहित्याची उपलब्धता आणि पुरवठ्यावरील परिणाम, यांसारख्या समस्यांचा सामना या क्षेत्राला करावा लागला आहे. याशिवाय कामगारांच्या टंचाईचा अडचणींचाही फटका या क्षेत्राला बसला आहे.
अशा परिस्थितीत, अनेक बिल्डर्सनी (डेव्हलपर्स) विलंब किंवा अडथळ्यांचा सामना करताना एलफॉर्स मेज्युअर (अपरिहार्य परिस्थिती/सवलत) कलमांचा आधार घेतला आहे.
मात्र, HoAB ने वेगळा मार्ग निवडला आहे.
अशा परिस्थितीचा वापर मुदतवाढ मागण्यासाठी करण्याऐवजी, कंपनीने बांधकामाचा वेग कायम ठेवण्यावर आणि ग्राहकांसाठी ताबा प्रक्रिया जलद करण्यावर लक्ष केंद्रित केले. हा प्रकल्प जानेवारी २०२६ मध्ये लाँच करण्यात आला होता आणि रेराकडे दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०३० म्हणजेच ५ वर्षांचा अपेक्षित कालावधी निश्चित केला गेला होता. नागपूर मरिनाचा ताबा डिसेंबर २०२८ मध्ये, म्हणजेच पूर्वी वचन दिलेल्या तारखेपेक्षा २ वर्षे आधी देण्याचा निर्णय, कंपनीची ग्राहकांविषयीची बांधिलकी दर्शवतो.
कंपनीने इम्पिरियल गोवा आणि दापोली येथील आयल ऑफ ब्लिसl यांसारख्या इतर प्रकल्पांमध्येही असाच यशस्वी अनुभव दाखवला आहे, जिथे मूळ दिलेल्या मुदतीपूर्वीच प्रकल्पांचा ताबा देण्यात आला होता
Previous Story Next Story