नवी दिल्ली,:
भारती एअरटेलने प्रायोरिटी पोस्टपेड ही नवी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. ही सेवा 5G स्लायसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पोस्टपेड ग्राहकांना उत्कृष्ट सातत्यपूर्ण नेटवर्क अनुभव प्रदान करते. काम, मनोरंजन किंवा ऑनलाइन सहयोगासाठी अखंड कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असलेल्या व्यस्त ग्राहकांसाठी ही सेवा विशेषतः विकसित करण्यात आली आहे.
या सेवेसाठी एअरटेलने 5G नेटवर्कमध्ये स्लायसिंग तंत्रज्ञानाच्या प्रगत क्षमतांसह सुधारणा केली आहे. यामुळे नेटवर्क अधिक कार्यक्षम बनते; अधिक क्षमता निर्माण होते; तसेच ही क्षमता विशिष्ट पद्धतीने वापरून प्रायोरिटी ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देणे शक्य होते. नेटवर्क क्षमतेचे बुद्धिमत्तापूर्ण गतिशील विभाजन करून, एअरटेल उच्च ट्रॅफिकच्या परिस्थितीतही पोस्टपेड ग्राहकांना स्थिर, विश्वासार्ह सातत्यपूर्ण अनुभव देत आहे.
गेल्या वर्षभरात अमेरिका, सिंगापूर, युनायटेड किंगडम मलेशिया यांसारख्या अनेक देशांमध्ये स्लायसिंग-आधारित 5G सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. भारतातील अशा प्रकारची ही एअरटेलची पहिलीच सेवा असून, अधिक स्मार्ट, सक्षम भविष्यकालीन डिजिटल नेटवर्क उभारण्यासाठी एअरटेल करत असलेल्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे हे प्रतीक आहे. प्रगत तंत्रज्ञान ग्राहक-केंद्रित नवकल्पना यांची सांगड घालण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेलाही हे अधोरेखित करते.
या लाँचबाबत प्रतिक्रिया देताना एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शश्वत शर्मा म्हणाले, एअरटेलमध्ये ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करणाऱ्या अर्थपूर्ण नवकल्पना सादर करण्यावर आहे. 5G स्लायसिंग तंत्रज्ञानावर आधारित प्रायोरिटी पोस्टपेड ही नवीनतम सेवा आहे. वाहतुकीत अडकून ग्राहक संवादात सहभागी होताना, गर्दीच्या संगीत कार्यक्रमात थेट प्रक्षेपणाचा आनंद घेताना किंवा गजबजलेल्या बाजारात टॅक्सी बुक करताना ग्राहकांना अधिक दर्जेदार, विश्वासार्ह अखंड अनुभव देण्यासाठी ही सेवा तयार करण्यात आली आहे.
एअरटेल ची प्रायोरिटी पोस्टपेड सेवा सुरू
एअरटेल ची प्रायोरिटी पोस्टपेड सेवा सुरू केली. ग्राहकांना उत्कृष्ट नेटवर्क अनुभवाचा लाभ
5G स्लायसिंग तंत्रज्ञानासह नेटवर्क अपग्रेड; पोस्टपेड ग्राहकांना अधिक अखंड कनेक्टिव्हिटी
5G स्लायसिंग तंत्रज्ञानासह नेटवर्क अपग्रेड; पोस्टपेड ग्राहकांना अधिक अखंड कनेक्टिव्हिटी