नागपूर:
वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे दोन गुंतागुंतीच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या रुग्णांना मिळाले नवजीवन
वोक्हार्ट हॉस्पिटल्स
नागपूर येथे एका महिन्यात दोन अत्यंत गुंतागुंतीच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहे. या यशामुळे मध्य भारतातील प्रगत आरोग्यसेवा ट्रान्सप्लांट उपचार क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या शस्त्रक्रियांमध्ये एक कॅडेव्हरिक (मृत दात्याकडून) यकृत प्रत्यारोपण दुसरे जिवंत दात्याकडून (मुलाकडून वडिलांना) यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. दोन्ही शस्त्रक्रिया डॉ. स्वप्निल शर्मा, कन्सल्टंट, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या समर्पित बहुविभागीय ट्रान्सप्लांट टीमने यशस्वीपणे पार पाडल्या. या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे.
यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. रुग्णांना यकृताचा शेवटचा टप्प्यातील आजार, अचानक यकृत निकामी होणे किंवा यकृताचे काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग आहेत, अशा रुग्णांसाठी ही एकमेव जीव वाचवणारी उपचार पद्धत आहे. शस्त्रक्रियेतील प्रगत तंत्रज्ञान, उत्तम अतिदक्षता सेवा शस्त्रक्रियेनंतरची काळजी यामध्ये झालेल्या सुधारणा यामुळे आज यकृत प्रत्यारोपणाच्या यशाचे प्रमाण 85% ते 90% पर्यंत वाढले आहे. यामुळे रुग्णांचे प्राण वाचण्याची शक्यता वाढली आहे जीवनमानाच्या गुणवत्तेतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.
पहिल्या प्रकरणात मृत व्यक्तीकडून (कॅडेव्हरिक) मिळालेल्या अवयवाच्या माध्यमातून यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. हे अवयव दान करण्याच्या उदात्त निर्णयातून शक्य झाले असून, एका व्यक्तीच्या दानामुळे अनेक जीव वाचू शकतात, हे यातून स्पष्ट होते अवयवदानाबाबत जनजागृतीचे महत्त्वही दिसून येते. दुसऱ्या प्रकरणात मुलाने वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान केला. हे जिवंत दात्याकडून केलेले यकृत प्रत्यारोपण होते, ज्यात मोठी भावनिक ताकद अत्यंत अचूक वैद्यकीय कौशल्याची गरज असते
वोक्हार्ट हॉस्पिटल ला यकृत प्रत्यारोपण यशस्वी - डॉ स्वप्नील शर्मा
वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर येथे दोन गुंतागुंतीच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या; रुग्णांना मिळाले नवजीवन
वोक्हार्ट हॉस्पिटल्स
डॉ स्वप्नील शर्मा
वोक्हार्ट हॉस्पिटल्स
डॉ स्वप्नील शर्मा