नागपूर .
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन पुणे चे बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.6 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता श्री सिद्वेश्वर सभागृह , नागपूर येथे सत्यशोधक विकास दत्तात्रय बोराटे ,फलटण सत्याशोधिका प्रतिक्षा सुरेश पोहनकर यांचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने मोफत 55 वा. सत्यशोधक विवाह सोहळा थाटात पार पडला.याप्रसंगी मी सावित्रीमाई फुले बोलतेय हे नाटक चंद्रपूर च्या आयु.गायत्री अनिलकुमार रामटेके यांनी प्रबोधनात्मक सादर केल्याने सोहळ्यास मोठी रंगत आली.या सोहळ्याचे विधिकर्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समितीचे निमंत्रित सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक हयांनी नेहमी प्रमाणे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विधी कार्य पार पाडले. यावेळी वधू वर याना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र थोर समाज सुधारक महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम भेट नागपूरचे नामवंत वकील केशव काकपुरे व रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते देण्यात आले. तसेच यावेळी वधू वर यांचे आई वडील तसेच मामा मामी यांना व एकपात्री कलाकार गायत्री रामटेके यांना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने फलटण साखर कारखान्याचे संचालक मा.पोपट जाधव व नागपूरचे एकाग्रता प्रशिक्षण व शोध संस्थेचे सचिव मा.विलास येसकर यांचे शुभहस्ते सन्मान पत्र ,शाल, श्रीफळ आणि 199 मान्यवरांना महात्मा फुले गीत चरित्र व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले ग्रंथ भेट देण्यात आले
सत्यशोधक विवाह आधुनिक काळाची गरज
समतावादी विचारांचा प्रसार करत अंधश्रद्धा, कर्मकांड, व अनाठायी खर्चाला विरोध करून समाजप्रबोधनात्मक सत्यशोधक विवाह घडावेत – मंत्री छगन भुजबळ