मुंबई:
ब्रिक्स सीसीआय डब्ल्यूई (महिला सक्षमीकरण) च्या सहाव्या वार्षिक महिला शिखर परिषद व सत्कार समारंभ (२०२६) यांना संबोधित करताना प्रमुख पाहुण्या तथा माननीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याची भारताची संकल्पना सर्वसमावेशक विकासावर दृढपणे आधारित आहे. ज्यामध्ये महिला सक्षमीकरण हा एक मध्यवर्ती आधारस्तंभ आहे. भारतातील युवक व महिलांना नाविन्यपूर्ण उपक्रम व उद्योजकता क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करणे हे राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
ब्रिक्ससह भागीदार देशांमध्ये उद्योजकता, व्यापार व्यवसायाला चालना देण्यासाठी समर्पित असलेली एक ना-नफा संस्था BRICS चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ची (BRICS CCI WE) महिला सक्षमीकरण शाखा नवोपक्रम, विज्ञान नेतृत्व, नवोपक्रम उद्योजकता क्षेत्रातील महिला – बदलाची प्रेरणा, भविष्याची जडणघडण) या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय शिखर परिषदेचे (२१-२३ मार्च) आयोजन केले.
स्वागतपर भाषण करताना ब्रिक्स सीसीआय डब्ल्यूई (महिला सक्षमीकरण) च्या अध्यक्षा श्रुबी सिन्हा म्हणाल्या, हे शिखर संमेलन म्हणजे कृतीसाठी दिलेले एक आवाहन आहे. अधिक सुदृढ परिसंस्था उभारणे, संधींची व्याप्ती वाढवणे व महिलांच्या नेतृत्वाखालील नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. विज्ञान व उद्योजकता या क्षेत्रांत महिला हा नेतृत्व करत असल्यास नाविन्यपूर्ण प्रक्रियेला गती मिळते, अर्थव्यवस्थांचा विस्तार होतो व समाजाचे परिवर्तन घडते.
ब्रिक्स सीसीआय डब्ल्यूई शिखर परिषद २०२६ मध्ये नाविन्य, विज्ञान व उद्योजकता क्षेत्रातील महिला नेतृत्वाला गती
संवादाकडून कृतीकडे : ब्रिक्स सीसीआय डब्ल्यूई शिखर परिषद २०२६ मध्ये नाविन्य, विज्ञान व उद्योजकता क्षेत्रातील महिला नेतृत्वाला गती या प्रसंगी माननीय राज्यमंत्री (युवक कार्य व क्रीडा) रक्षा खडसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पंतप्रधानांच्या सर्वसमावेशक व सशक्त भारताच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला.