RAJKIYA

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Nagpur Media News 08 Apr, 2026
भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
राष्ट्र प्रथम मंत्रासह भाजपाचा विस्तार – पक्षाच्या ४७व्या वर्षात प्रवेशानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया
सोमवारी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे. ६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची स्थापना झाली. पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत
मुंबई:
भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला आहे – प्रदेशाध्यक्ष रविंद्र जी चव्हाण
राष्ट्र प्रथम मंत्रासह भाजपाचा विस्तार – पक्षाच्या ४७व्या वर्षात प्रवेशानिमित्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया
सोमवारी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे. ६ एप्रिल १९८० रोजी पक्षाची स्थापना झाली. पक्षाने ४६ वर्षे पूर्ण करून ४७व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लेख लिहून आपले विचार मांडले आहेत. सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास फक्त भाजपसारख्या संघटनेतच शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे लिहिले की, विचारधारेच्या घट्ट मुळांनी मातीत रुजलेला कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला भारतीय जनता पक्षाचा विशाल वटवृक्ष आज ४७व्या वर्षात पदार्पण करत आहे. ६ एप्रिल १९८० रोजी रोवलेले हे बीज आज सुमारे २५ कोटींहून अधिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीने संपूर्ण देशभर विस्तारले आहे.
रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, भाजयुमोचा उपाध्यक्ष, नगरसेवक, आमदार, कॅबिनेट मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या नात्याने जेव्हा मी पक्षाच्या इतिहासाकडे पाहतो, तेव्हा मला जाणवतं की जसे विचारधारेने एक एक कार्यकर्ते घडवले आणि त्याचप्रमाणे असंख्य ध्येयवादी कार्यकर्त्यांनी रक्ता-घामाने गुरुदक्षिणा म्हणून पक्षाला घडवले. जेव्हा नेहरू-गांधींची अल्पसंख्याक-केंद्रित समाजवादी विचारसरणी आणि साम्यवादी चळवळींचा जागतिक प्रभाव होता, त्या काळात जनसंघाच्या माध्यमातून बहुसंख्य पण वंचित समाजाला केंद्रस्थानी ठेवण्याचे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे धैर्य डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या नेत्यांनी दाखवले. त्यांची दूरदृष्टी आजही मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
भाजपच्या या प्रवासात अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान
वैचारिक पाया नेतृत्वाची परंपरा लाभलेल्या भाजपच्या या प्रवासात अनेक ऋषितुल्य नेत्यांचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्र भाजपाचाच विचार करायचा झाला तर १९८० मध्ये उत्तमराव पाटील यांनी पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचा पाया रचला. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाला गावागावात नेले आणि बहुजन व ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. १९९५ मध्ये काँग्रेसची सत्ता हटवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता
Previous Story Next Story