नागपूर:
आयसीआयसीआय लोम्बार्ड ने सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात नागपूर येथे राईड टू सेफ्टी रॅलीचे आयोजन केले होते. नागपूर शहराच्या सन्माननीय महापौर नीता राजेंद्र ठाकरे पोलीस उपायुक्त (वाहतूक) रश्मिता राव यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा उपायांबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे.
शालेय विद्यार्थी पालकांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. हेल्मेट वापरण्यासह रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. या उपक्रमांतर्गत आयसीआयसीआय लोम्बार्डने संरक्षणात्मक साधनांचे महत्त्व सुरक्षित प्रवासाच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल एक हजार हेल्मेटचे वाटप केले.
आयसीआयसीआय लोम्बार्ड रस्ते सुरक्षेसाठी कटिबद्ध असून जनजागृती, प्रतिबंध पुनर्वसन अशा सर्वच स्तरांवर कार्य करते. पालकांमध्ये आणि मुलांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत वर्तणूक बदल घडवून आणण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केलेले आहे. यासाठी खास थेट संपर्क कार्यक्रमांचेसुध्दा आयोजन केले जाते, सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटसारख्या संरक्षणात्मक साधनांचे वाटप करून त्यांचे महत्वसुध्दा मनावर ठसविले जाते.
आयसीआयसीआय लोम्बार्डकडून रस्ते सुरक्षेप्रती वचनबद्धता पुन्हा अधोरेखित
सुरक्षितरित्या वाहन चालवण्याच्या पद्धतींबद्दल जागरूकतेसाठी नागपूरमध्ये राइड टू सेफ्टी रॅलीचे आयोजन करण्यात आले मुलांना, पालकांना वाहतूक पोलिसांना १,००० हेल्मेटचे वाटप करण्यात आले
२०१५ पासून १० लाखांपेक्षा अधिक भारतीयांशी थेट संवाद साधत आहे आतापर्यंत भारतात 6 लाख हेल्मेट वितरित करण्यात आले आहे आणि हा कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे आयसीसी आय लोंबार्ड कंपनीने सांगितले
याप्रसंगी डिसिपी वाहतूक रश्मिता राव यांनी हेल्मेट चे महत्व विषद केले नागपूर महापौर नीता ठाकरे यांनी असे रस्ते वाहतूक व सुरक्षा संबंधित कार्यक्रम व जागरूकता होणे काळाची गरज आहे आणि आभार मानले रेल्वे मेन्स स्कूल चे अध्यक्ष विजय ठाकरे याचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे याचा सत्कार करण्यात आला व रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला