MANORANJAN

९१११ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास,मोडला सांगलीकरांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Nagpur Media News 09 Mar, 2026
९१११ डोंबिवलीकरांनी रचला इतिहास,मोडला सांगलीकरांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. या आधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी सांगितले. त्या ठिकाणी या आधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता,
डोंबिवली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ९ हजार १११ महिला विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी महिला भगिनी आदींनी एकत्र येत ९,१११ एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. या आधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी सांगितले. त्या ठिकाणी या आधी ७ हजार ३३८ महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता, मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले
Previous Story Next Story