नागपूर,
: वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त जनजागृतीचा ठोस संदेश देत मैक्स हॉस्पिटल, नागपूरने कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विविध वयोगट क्षेत्रांतील लोक एकत्र येत निरोगी आणि कर्करोग-जागरूक समाजासाठी सामूहिक संकल्प व्यक्त केला.
कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी लवकर निदान, प्रतिबंधात्मक काळजी सक्रिय जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. सहभागी नागरिकांनी ठरवलेल्या मार्गावर जोशात सायकल चालवत एकजूट आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठीची बांधिलकी दर्शवली.
यावेळी बोलताना प्रख्यात इंटरनॅशनल सायकलिस्ट आणि एन्ड्युरन्स ऍथलेट डॉ. अमित समर्थ म्हणाले, कर्करोग हा आता आशाहीन आजार राहिलेला नाही. वैद्यकीय विज्ञानातील प्रगती, लवकर निदान निरोगी सवयींचा अवलंब यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग टाळता येऊ शकतात. अशा सायक्लोथॉनसारख्या उपक्रमांमुळे जनजागृती वाढवण्यास लोकांना त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी प्रेरित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते.
मॅक्स हॉस्पिटल द्वारा कर्करोग जनजागृती साठी सायक्लोथॉन
मैक्स हॉस्पिटल, नागपूरने निरोगी जीवनशैली आणि कर्करोग जनजागृतीसाठी सायक्लोथॉनचे 8 फेब्रुवारी 2036 ला आयोजन संपन्न