UDYOJAGTA

फ्रॅंकलिन टेम्पलटन इंडियाचा चेंज द सोच- कन्याकुमारी ते काश्मीर अभियान राष्ट्रव्यापी उपक्रम

Nagpur Media News 05 Feb, 2026
फ्रॅंकलिन टेम्पलटन इंडियाचा चेंज द सोच- कन्याकुमारी ते काश्मीर अभियान राष्ट्रव्यापी उपक्रम
फ्रॅंकलिन टेम्पलटन इंडियाचा चेंज द सोच- कन्याकुमारी ते काश्मीर अभियान राष्ट्रव्यापी उपक्रम म्यूचुअल फंड गुंतवणुकीविषयी जागरूकता पसरवण्यासाठी ऑरेंज सिटी नागपुरात पोहोचला फ्रॅंकलिन टेम्पलटन इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशा 4000+ किमी प्रवासाला निघाले आहेत या प्रवासात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोकांशी ते संवाद साधत आहेत
गुंतवणूकदारांना साक्षर करणारा हा उपक्रम विशेषतः भारतातील महिलांच्या आर्थिक साक्षरतेवर भर देणार आहे, जेणेकरून त्यांची बचतीपासून गुंतवणुकीपर्यंत प्रगती होऊ शकेल
नागपूर,
चेंज द सोच- कन्याकुमारी ते काश्मीर अभियान हा फ्रॅंकलिन टेम्पलटनचा अनोखा, राष्ट्रव्यापी उपक्रम नागपूरमध्ये पोहोचला आहे, ज्याचा उद्देश विशेषत महिलांमध्ये आर्थिक सक्षमतेचा प्रचार करण्याचा आहे. फ्रॅंकलिन टेम्पलटनच्या भारतातील 30 वर्षांच्या वाटचालीचा गौरव करणारा हा 30-दिवसांचा प्रवास कन्याकुमारी या देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झाला असून 21 शहरांमधून मार्ग काढत श्रीनगर, जम्मू काश्मीर येथे समाप्त होणार आहे. इंटरॅक्टिव्ह आर्थिक साक्षरता सत्रे, तज्ज्ञांचे विचार समुदायाचा सहभाग या माध्यमातून या मोहिमेचा उद्देश म्यूचुअल फंड गुंतवणुकीशी निगडीत गैरसमज दूर करण्याचा तसेच हजारो भारतीयांना त्यांच्या आर्थिक भविष्याचा ताबा स्वतःच्या हाती घेण्यासाठी आत्मविश्वास देण्याचा आहे.फ्रॅंकलिन टेम्पलटन इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर या मोहिमेचे नेतृत्व करतील आणि देशाच्या प्रवासातून आर्थिक समावेशकतेचा पुरस्कार करतील. ते दर दोन दिवसांनी एका नव्या गावात किंवा शहरात थांबून महिलांच्या विविध गटांसाठी गुंतवणूकदार शिक्षण कार्यशाळांचे आयोजन करतील व त्यांना जीवनातील लक्ष्य साध्य करण्यासाठी बचत, गुंतवणूक दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे महत्त्व समजावून देतील. या मोहिमेत सहभागी मोठ्या संख्येत सामील होतील. त्यापैकी बहुतांशी महिला असतील, ज्या शेतकरी (मासेमारी करणाऱ्या समुदायापासून ते विविध पिके घेणाऱ्या समुदायापर्यंत), शैक्षणिक क्षेत्रातील महिला (विद्यार्थी, पालक, शाळा-कॉलेजच्या शिक्षिका), सेल्फ-हेल्प ग्रुप (अन्न हँडलूम क्षेत्रातील महिला), उद्योजिका, खाजगी सरकारी क्षेत्रातील कर्मचारी सेना, नौकादळ पोलीस खात्यातील अधिकारी वगैरे असू शकतात.
उपक्रमाविषयी बोलताना फ्रॅंकलिन टेम्पलटनचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर म्हणाले, भारताच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकासासाठी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणे अनिवार्य आहे. शहरी केंद्रांनी आर्थिपूर्ण प्रगती केली आहे, पण देशातील लक्षावधी महिला, विशेषतः टियर 2 टियर 3 प्रदेशातील महिला आर्थिक ज्ञान साधने यांच्यापर्यंत पोहोच मिळवण्याच्या बाबतीत वंचित राहिल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जीवनातील विविध क्षेत्रातील महिलांशी संवाद साधू त्यांना बचत, गुंतवणूक करण्यास डिजिटल फायनॅन्सचा अंगीकार करण्यासाठी ज्ञान आत्मविश्वास देऊन सक्षम करू.जेव्हा महिला माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेतात तेव्हा कुटुंबं लवचिक होतात, समुदायांची भरभराट होते देश सर्वसमावेशक वृद्धीच्या जवळ पोहोचतो. ही दरी भरून काढणे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या देशाच्या ध्येयाच्या अधिक समावेशक व शाश्वत आर्थिक ईकोसिस्टम बनवण्याच्या दिशेत उचललेले हे एक आवश्यक पाऊल आहे.
Previous Story Next Story