नागपूर,
23 डिसेंबर 2025: भारताच्या आघाडीच्या ऑनलाइन इन्शुरन्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या पॉलिसीबाजारने तरआज नागपूर येथे आयोजित प्रेस इंटरॅक्शनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पश्चिम भारतात इन्शुरन्स गुंतवणूक प्रोडक्ट्सबद्दल वाढती जागरूकता मागणी असल्याचे सांगितले. तरुण, महत्वाकांक्षी ग्राहक वर्ग मार्केट-लिंक गुंतवणुकीतील वाढती रुची पाहता,नागपूर पॉलिसीबाजारच्या लाईफ इन्शुरन्स गुंतवणूक उत्पादनांसाठी महत्त्वाचा बाजारपेठ बनला आहे. कंपनीने सांगितले की, भारताच्या व्यापक आर्थिक वाढीमुळे घरगुती खर्च वाढत आहे, लोक वित्तीय बाजारात जास्त सहभागी होत आहेत दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याकडे लक्ष देत आहे. या भागातील ग्राहक महागाईवर मात करणारे परतावे मिळवण्यासाठी इक्विटी-लिंक्ड प्रोडक्ट आणि निवृत्ती नियोजन उपायांकडे वळत आहेत.कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यक्रमात बोलताना,
पॉलिसीबाजारचा नागपूरमध्ये विस्तार; मार्केट-लिंक गुंतवणूक आणि टर्म इन्शुरन्सची मागणी वाढली
एचएनआय ग्राहकांचा वाटा आता जवळपास एक-पंचमांश आहे, जे 2023 च्या तुलनेत तीनपट आहे. टर्म इन्शुरन्समध्ये, 2023 पासून एचएनआय ग्राहकांचा मासिक सहभाग 75 टक्क्यांनी वाढला असून, एकूण व्यवसायात त्यांचा वाटा सुमारे एक-पंचमांश आहे. टर्म इन्शुरन्सची मागणी टर्म इन्शुरन्सच्या मागणीत सातत्याने मजबूत वाढ दिसून येत आहे. यामागे मुख्यत्वे तरुण आणि वेतनधारक ग्राहक आहेत, जे साधारणपणे वेगाने वाढणाऱ्या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. एकूण मागणीत वेतनधारकांचा वाटा सुमारे तीन-चतुर्थांश आहे आणि 2023 ते 2025 या कालावधीत या वर्गात 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. 25 ते 40 वयोगटातील मासिक ग्राहकांची संख्या दुप्पट झाली असून, लवकर वयात आर्थिक संरक्षणाबाबत वाढती जागरूकता यामधून दिसून येते.