नागपूर: : नेल्सन ग्रुपने नेल्सन लक्स प्रीमियम मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटनाची अभिमानाने घोषणा केली आहे. मातांसाठी जागतिक दर्जाचा प्रसूती अनुभव, नवजात बाळांसाठी अत्याधुनिक बालरोग सेवा तसेच आरामदायक सुविधा देणारे हे हॉस्पिटल नागपुरातील पहिलेच असे आरोग्यकेंद्र ठरणार आहे. देशपांडे लेआउट, सेंट्रल अव्हेन्यू येथील नेल्सन लक्स हॉस्पिटलचे उद्घाटन उद्या, रविवार, 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता, . नितीन गडकरी जी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी श्री. दत्ता जी मेघे, श्री. सागर जी मेघे आणि हिंगणा विधानसभेचे आमदार श्री. समीर जी मेघे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या हॉस्पिटलच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सी.ई.ओ. डॉ. सोनलकुमार भगत यांच्यासह प्रसूतीशास्त्र, नवजात शिशुरोग (निओनॅटोलॉजी), बालरोग, वंध्यत्व उपचार (फर्टिलिटी) आणि स्त्री आरोग्य यासंबंधी वरिष्ठ तज्ज्ञ आणि सल्लागार डॉक्टरांची टीमही उपस्थित होती.
प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सी.ई.ओ. डॉ. सोनलकुमार भगत यांनी सांगितले,नेल्सन लक्स हे केवळ हॉस्पिटल नाही, तर एक परिपूर्ण अनुभव आहे. मातांसह बाळांना सर्वोच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देताना, त्यांना उबदार, आरामदायक आलिशान वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. अनुभवी वैद्यकीय डॉक्टरांच्या पाठबळासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मध्य भारतात मातृत्व आरोग्यसेवा नव्याने उभारण्याचा प्रयत्न करतो.
डॉ. सतीश देवपुजारी यांनी सांगितले, सी.ए. रोडवरील नेल्सन हॉस्पिटल हे मातृ बालरोग सेवेत सुधारणा करण्यासाठी तयार केले गेले आहे, जिथे वैद्यकीय कौशल्यासोबत आराम सन्मान दिला जातो. आमचा उद्देश फक्त उपचार देणे नाही, तर मातांसाठी, नवजात बाळांसाठी आणि कुटुंबांसाठी संपूर्ण काळजीचा अनुभव देणे आहे.
बियॉन्ड बर्थिंग या संकल्पनेतून साकारलेल्या नेल्सन लक्समध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तज्ज्ञता, आई-बाळांच्या वैयक्तिक गरजेनुसार आखलेली उपचार पद्धती आरामदायक सुविधा एकत्रित करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे प्रत्येक आई बाळाला सर्वोच्च दर्जाची काळजी, लक्ष आराम मिळतो.
मातृ बालरोग सेवेत नवीन मापदंड
नेल्सन लक्सची संकल्पना मातांना सर्वांगीण, सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या समाधान देणारा मातृत्वाचा अनुभव देण्यासाठी तयार केली गेली आहे, यामध्ये पुढील सुविधा उपलब्ध आहेत
नेल्सन लक्सचा नागपुरात शुभारंभ: मातृ व बाल आरोग्यसेवेला नवी दिशा देणारे प्रीमियम हॉस्पिटल
नेल्सन लक्सचा नागपुरात शुभारंभ मातृ व बाल आरोग्यसेवेला नवी दिशा देणारे प्रीमियम हॉस्पिटल आई आणि बाळांसाठी खास नेल्सन लक्स हॉस्पिटलचे नागपुरात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व भाजप चे वरिष्ठ नेते दत्ताजी मेघे यांचे हस्ते 14 डिसेंबर 2025 ला 12 वाजता उदघाटन होणार आहे