AROGYA

उबदार राहा, तंदुरुस्त राहा : वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूर: स्वाती अवस्थी

Nagpur Media News • 10 Dec, 2025
उबदार राहा, तंदुरुस्त राहा : वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूर:   स्वाती अवस्थी
राहा, तंदुरुस्त राहा : वोक्हार्ट हॉस्पिटल नागपूरने हिवाळ्यातील पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगितले
स्वाती अवस्थी, मुख्य आहारतज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स
नागपूर:
हिवाळा आला की ओठ फाटणे, त्वचा कोरडी पडणे, टाचांना भेगा पडणे असे त्रास वाढतात. रजईत एक तास जास्त गुंडाळून बसण्यासाठी हा सुंदर मोसम असला तरी या काळात सर्दी, खोकला आणि फ्लूची लक्षणे जास्त दिसतात. त्यामुळे लोक बहुतेक वेळ घरातच राहणे पसंत करतात. तसे पाहिले तर हिवाळा हा गरम अन्न पदार्थ, हेल्दी फूड गरम कपड्यांचा काळ आहे. या हंगामात मानवी शरीराची चयापचय आणि उर्जा पातळी बदलते. खाण्याच्या सवयींमध्येही बदल जाणवतो. हिवाळ्यात अधिक खाण्याची इच्छा निर्माण होते आणि उबदार वाटण्यासाठी लोक जास्त कॅलरीचे पदार्थ खाण्याकडे वळतात. थंडीत आजारांपासून बचावासाठी शरीराला काही प्रमाणात अतिरिक्त ऊर्जा आवश्यक असली तरी, हवामान हे अस्वस्थ किंवा अयोग्य खाण्याचे कारण ठरू नये. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरने हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवणाऱ्या आणि आरोग्य मजबूत करणाऱ्या पौष्टिक खाद्यपदार्थांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
आता शरीराच्या पोषणाच्या गरजांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती किती महत्त्वाची आहे, हे आपण सर्वांनी अनुभवले आहे. हिवाळ्यात सर्दी-खोकला लवकर होते, आणि अशा वेळी आजारी पडणे कोणालाही नकोच असते. हिवाळ्यात अनेक असे खाद्यपदार्थ उपलब्ध असतात जे केवळ चविष्टच नाहीत, तर शरीराला उब देणारे आणि आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असतात. बाजारात ताजी फळे आणि भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. या हंगामातील निसर्गाची ही देणगी जरूर उपभोगा. या हिवाळ्यात आपल्या आहारात नक्की समाविष्ट करावेत असे काही हिवाळी सुपर फूड्स ची यादी आहे
Previous Story Next Story