SMAMAJIK

रस्ता सुरक्षेसाठी महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम झेब्रु शुभंकराचे नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Nagpur Media News 10 Dec, 2025
रस्ता सुरक्षेसाठी महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम झेब्रु शुभंकराचे नागपूरात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
सुरक्षेसाठी महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम झेब्रु शुभंकराचे नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा शुभंकर झेब्रु चे भव्य अनावरण; रस्ता सुरक्षेसाठी
झेब्रु ठरेल रस्ता सुरक्षा जनजागृती दूत
नागपूर येथे अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
नागपूर,:
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा शुभंकर झेब्रु या रस्ता सुरक्षा जनजागृती दूत अभिनव उपक्रमाचा अनावरण सोहळा नागपूर येथे उत्साहात पार पडला. ९ डिसेंबर रोजी विधानभवनमधील कॅबिनेट हॉलमध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमात राज्यातील तसेच नागपूर परिसरातील अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झेब्रु शुभंकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री (परिवहन) माधुरी मिसाळ तसेच परिवहन व बंदरे विभाग, महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी व परिवहन आयुक्त विवेक भिमनवार उपस्थित होते. झेब्रु हा महाराष्ट्र राज्याचा अधिकृत रस्ता सुरक्षा जनजागृती दूत आहे. झेब्रा या प्राण्याच्या पट्ट्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला हा झेब्रु रस्ते सुरक्षा, शिस्त वाहतुकीच्या नियमांची जाणीव लोकांमध्ये निर्माण करतो. विशेषतः पादचारी सुरक्षा, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, हेल्मेट व सीट बेल्ट, वेगमर्यादा पाळणे, लेन शिस्त राखणे, पादचाऱ्यांना प्राधान्य देणे जबाबदारीने वाहन चालवणे या सारख्या मूलभूत नियमांवर झेब्रु प्रभावीपणे संवाद साधू शकतो
Previous Story Next Story