UDYOJAGTA

एअरटेलच्या व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांचे पत्र

Nagpur Media News 29 Nov, 2025
एअरटेलच्या  व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांचे पत्र
एअरटेलच्या व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांचे पत्र
प्राथमिक बँक खात्यातून यूपीआय पेमेंट केल्याने डिजिटल फसवणुकीचा धोका वाढतो
नागपूर:
भारतात डिजिटल फसवणूकीच्या घटना उघडकीस येत आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांचे केसेस पाहता भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी या सततच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केली. या घटना आटोक्यात येण्यासाठी एअरटेलकडून राबवल्या जाणा-या आवश्यक उपाययोजनांबद्दल माहिती देण्यासाठी ग्राहकांना उद्देशून पत्र लिहिले आहे. आजकाल बनावट पार्सल डिलीव्हरीचे कॉल, फिशिंग लिंक्स डिजिटल अरेस्ट आदी घोटाळे मोठ्या प्रमाणात घडत असताना एअरटेल ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सेफ सेकं अकाउंटची घोषणा केली. हे खाते ग्राहकांच्या मुख्य बँक खात्यापासून स्वतंत्र ठेवले जाते. यामुळे डिजिटल पेमेंटसाठी वापरण्यात येणारा पैसा सुरक्षित राहतो आणि कोणत्याही संभाव्य फसवणूकीपासून अतिरिक्त संरक्षण मिळते.

एअरटेल नेटवर्कमध्ये होणारे गुन्हे किंवा फसवणूकीच्या घटना मोठी चिंतेची बाब आहे. ग्राहकांची सुरक्षितता हेच आमचे कायमस्वरुपी प्राधान्य राहील. असे एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले. ग्राहकांच्या डिजीटल देयकांच्या सुरक्षिततेसाठी एअरटेलकडून होणा-या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, एअरटेल कंपनी अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ग्राहकांना स्पॅम कॉल मेसेजबाबत कल्पना यावी याकरिता त्वरित अलर्ट देते. ग्राहकांनी चुकून एखादी लिंक क्लिक केली असेल तर ती लिंक ब्लॉक करण्याचीही सोय उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु, आजच्या डिजिटल युगात आपले प्राथमिक बँक खाते किंवा इतर पेमेंट एप्लिकेशनशी जोडल्यास आपल्या बचतीला धोका निर्माण हो शकतो.अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. हा धोका टाळण्यासाठी तसेच ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी सेफ सेकंड अकाऊंट हा सुरक्षित आणि सोप्पा उपाय आता उपलब्ध करुन दिल्याचे ते म्हणाले.
Previous Story Next Story