SMAMAJIK

शिवकृपानंद स्वामीजी जी आशिर्वचनातून साधकांना केले मंत्रमुग्ध

Nagpur Media News 08 Oct, 2025
शिवकृपानंद स्वामीजी जी आशिर्वचनातून साधकांना केले मंत्रमुग्ध
सद्गुरु श्री शिवकृपानंद स्‍वामीजी यांच्‍या मंगल वाणीचा हजारो साधकांनी घेतला लाभ
ध्‍यानस्‍थली नागपूर येथील महानवरात्री अनुष्‍ठानाचा समारोप
नागपूर, :
सहसा आपण ज्याला धर्म समजतो ती उपासना पद्धती असून त्यातून आंतरिक बदल घडून येत नाही. आंतरिक बदल घडवण्याकरिता आत्मानुभूतीचे संस्कार आवश्यक असून हे अमूल्य संस्कार समाजातील माणसांपर्यंत पोचावे ह्या उद्देशानेच हिमालयातील सद्गुरूंनी स्वामीजींना ह्या आत्मज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यास अधिकृत केले. असे आशीर्वचन हिमालयीन सद्गुरु श्री शिवकृपानंद स्‍वामीजी यांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित भक्‍तांना दिले.
ध्यानस्थली नागपूर, मध्यभारत समर्पण आश्रम, ठाणा (पादरी), बुटीबोरी-उमरेड रोड, येथे 22 सप्‍टेंबर ते 1 ऑक्‍टोबर दरम्‍यान नवरात्री अनुष्‍ठानाचे आयोजन करण्‍यात आले होते ज्या अंतर्गत येथे बांधण्यात आलेल्या भव्य श्री गुरुशक्तिधाम येथे श्री मंगल मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व दिनांक २ ऑक्टोबर रोजी त्याचा भव्य लोकार्पण सोहोळा आयोजित करण्यात आला. त्‍यावेळी सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींच्‍या आध्यात्मिक सत्संगाचा दस-याच्‍या शुभमुहूर्तावर हजारो साधकांनी लाभ घेतला.
लोकार्पण सोहोळ्याचा प्रारंभ सुरुवातीला अतिरिक्‍त पोलिस महासंचालक श्री अजेय रानडे, नागपूर रेंजचे पोलिस महानिरीक्षक श्री संदीप पाटील, राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री राणा सुर्यवंशी, रुबी हॉल पुणेचे अध्‍यक्ष डॉ. परवेझ ग्रांट, योग प्रभा भारती सेवा संस्‍था ट्रस्टच्‍या व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती शीना ओमप्रकाश, लॉईड एनर्जी लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री प्रभाकरण, व कार्यकारी संचालक श्री व्‍यंकटेशन, गंगाधर इन्फोटेकचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री आशीष फडणवीस, बेल लॅब कॅलिफोर्निया विद्यापीठाचे श्री नरसिम्‍हा रेड्डी, आयसीएआरचे उपसंचालक डॉ. सुरेश चौधरी, गुजरातचे निवृत्‍त पोलिस महासंचालक श्री एस. एस. खांडवाला यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून करण्‍यात आला. त्‍यानंतर पुजनीय गुरुमाँ च्‍या हस्‍ते श्री गुरुशक्तीधामचे लोकार्पण करण्‍यात आले. हे भव्य श्री गुरुशक्तीधाम अवघ्या 9 महिन्यात तयार करण्यात आले आहे. साधकांच्‍या जयघोषात सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींचे मंचावर आगमन झाले.
स्‍वामीजींनी हिमालयातील त्‍यांची साधना आणि आत्‍मसाक्षात्‍काराच्‍या अनुभूतीचे ऊर्जात्‍मक वाणीतून साधकांना दर्शन घडवले. ते म्‍हणाले, ज्ञान जितके वाटले तितके ते वाढत असते. प्राप्‍त झालेले अनुभव, संस्‍कार आणि ज्ञान पुढच्‍या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपल्‍या सर्वांची जबाबदारी आहे
Previous Story Next Story