AROGYA

विदर्भाचे हृदय धोक्यात - वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सर्व्हेतून धक्कादायक निष्कर्ष

Nagpur Media News 26 Sep, 2025
विदर्भाचे हृदय धोक्यात - वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सर्व्हेतून धक्कादायक निष्कर्ष
मध्यमवयीन तरुण रुग्णांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका, उपचारा साठी उशिरा पोहोचल्याने रुग्णाची वाचण्याची शक्यता कमी. वोक्हार्ट हॉस्पिटल ने शहरात 48 डॉक्टरचा हृदय रोगाशी निगडित डॉक्टर कडे येणाऱ्या विविध वयो गटातील स्त्री पुरुष याचे सर्वेक्षण केले आहे सर्वेनुसार विदर्भात कोविड नंतर रुग्णाच्या प्रमाणात वाढ झाल्याची निदर्शनास आले असल्याचे हॉस्पिटल च्या डॉक्टरनी स्पष्ट केले
नागपूर,:
: वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांनी नागपूर व आसपासच्या भागातील डॉक्टरांमध्ये एक महिन्याचे हार्ट हेल्थ इन्साईट्स सर्व्हेक्षण केले. कार्डिओलॉजिस्ट, जनरल प्रॅक्टिशनर्स रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स (आरएमओ) सहभागी झाले. या सर्व्हेमुळे मध्य भारतातील हृदयविकाराशी संबंधित आव्हानांचे संपूर्ण चित्र समोर आले.
सर्व्हेक्षणातील निष्कर्ष चिंताजनक आहेत हृदयरोग फक्त वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बहुतांश डॉक्टरांच्या मते 41 ते 60 वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त आहे. 30 वर्षांच्या आसपासच्या तरुणांमध्येही हृदयरोगाचे प्रकरणे वाढल्याचे नमूद केले.
दहा वर्षांपूर्वी नागपूरमध्ये 30 वर्षांच्या रुग्णांना हृदयरोग होताना पाहणे दुर्मिळ होते. आज तणावपूर्ण नोकऱ्या, चुकीची जीवनशैली वेळेवर तपासणी न केल्यामुळे तरुण रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. हा एक मोठा इशारा आहे. असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉ. नितीन तिवारी यांनी सांगितले.
सर्व्हेक्षणात दिसून आले की हृदयाची प्रतिबंधात्मक तपासणी अजूनही होत नाही. अनेक डॉक्टरांनी सांगितले की रुग्ण फक्त लक्षणे दिसल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये येतात, प्रतिबंधात्मक तपासणीसाठी येणे अगदी कमी आहे.
स्पर्धात्मक वातावरणात, कामाच्या ठिकाणी असो वा घरात तरुणांवर प्रचंड ताण असतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो,असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सिनियर सीव्हीटीएस सर्जन डॉ. सुमित नारंग यांनी सांगितले.
शहरीकरण, बसून काम करण्याची सवय, पोटाभोवती वाढलेली चरबी, आहारातील बदल, वाढते प्रदूषण, ताण, अपुरी झोप, लवकर सुरू होणारा मधुमेह आनुवंशिक कारणे हे सर्व घटक भारतीय रुग्णांमध्ये कमी वयात हृदयरोग होण्यास कारणीभूत ठरत आहे. असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिनेश पडोळे यांनी सांगितले.
रुग्णांना प्रतिबंधात्मक तपासणीची सवय अजूनही नाही. रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचेतोवर उपचाराचा सुवर्णकाळ निघून जातो. जागरूकता वेळेवर तपासणी हीच खरी गरज आहे. असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमित बल्लमवार यांनी सांगितले. चिंताजनक बाब म्हणजे जागरूकतेचा अभाव. दोन-तृतीयांशाहून अधिक डॉक्टरांनी सांगितले की रुग्णांना स्वतःचा रक्तदाब, कोलेस्टेरॉल साखरेची पातळी याची पूर्ण माहिती नसते. अर्ध्याहून अधिक डॉक्टरांनी असेही पाहिले की रुग्ण हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे जसे की, छातीत दुखणे, घाम येणे किंवा श्वास घेणे अवघड होणे ओळखू शकत नाहीत.
हे सर्व्हेक्षण नागपूरमधील प्रत्यक्ष परिस्थिती दाखवतो. जागरूकता, वेग उपचारांची उपलब्धता हे तीन महत्वाचे घटक आहेत. वोक्हार्टमध्ये डॉक्टर, समाज माध्यमांच्या मदतीने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत विदर्भातील रुग्णाचे आरोग्य सुधारणे ही आमची जबाबदारी मानतो.असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सेंटर हेड रवी बागली यांनी सांगितले.
संपूर्ण सर्व्हेक्षणात पश्चिम भारतातील मुंबई शहर, एमएमआर, राजकोट नागपूर यांचा समावेश होता येथील सुमारे 326 डॉक्टरांनी सहभाग घेतला. यापैकी 48 डॉक्टर नागपूरचे होते हा रिपोर्ट त्यांच्या मतांवर आधारित आहे.
Previous Story Next Story