नागपूर, ;
एओआय नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलने आज एओआय ऑन्कोलॉजी कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये अत्याधुनिक ब्रॅकीथेरपी सेवा सुरू असल्याची घोषणा केली. हे मध्य भारतात सर्वसमावेशक उच्च दर्जाच्या कॅन्सर उपचारांच्या दृष्टीने हॉस्पिटलच्या ध्येयातील महत्त्वाचा टप्पा आहे.
हॅल्सियन ट्रूबीम सारख्या प्रगत रेडिएशन मशीनसह आधीच सुसज्ज असलेल्या एओआय नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिशय अचूक बाह्य बीम रेडिएशन थेरपी दिली जाते. ब्रॅकीथेरपी सेवा सुरू झाल्यामुळे, हॉस्पिटल रेडिएशन उपचारांची संपूर्ण सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते, ज्यामुळे रुग्णांना त्वरित, अचूक, परवडणारे उच्च दर्जाचे कॅन्सर उपचार त्यांच्या घराजवळ मिळेल.
ब्रॅकीथेरपी म्हणजे काय?
ब्रॅकीथेरपी ही रेडिएशन थेरपीची एक लक्षित पद्धत आहे, ज्यात रेडियोधर्मी सोर्स थेट ट्यूमराच्या आत किंवा जवळ ठेवला जातो. यामुळे डॉक्टरांना कॅन्सर पेशींना उच्च मात्रेतील रेडिएशन थेट देणे शक्य होते आसपासच्या निरोगी ऊतींना होणारी हानी कमी होते. ही पद्धत गर्भाशय ग्रीवा, गर्भाशयाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, स्तन कॅन्सर काही डोके व गळ्याच्या कॅन्सरसाठी अत्यंत प्रभावी आहे, तसेच ब्रॅकीथेरपीमुळे एकूण उपचाराचा कालावधी कमी होतो.
श्री दिलीप मांगसुली, चेअरमन, सीटीएसआय ग्रुप, म्हणाले: एओआय मध्ये ध्येय नेहमीच प्रगत कॅन्सर उपचार परवडणारी सेवा यामधील अंतर कमी करण्याचे आहे. नागपूरमध्ये ब्रॅकीथेरपी सुरु केल्यामुळे, मध्य भारतातील रुग्णांसमोर अत्यंत अचूक आणि प्रभावी रेडिएशन उपचार आणत आहोत. हे तंत्रज्ञान फक्त उपचाराची अचूकता वाढवत नाही, तर साइड इफेक्ट्स एकूण उपचाराचा कालावधीही कमी करते, ज्यामुळे रुग्णांचा जीवनमान सुधारते.उद्दिष्ट म्हणजे कोणत्याही रुग्णाला अत्याधुनिक कॅन्सर सेवा मिळवण्यासाठी लांब अंतर प्रवास करावा लागू नये किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. एओआय नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ब्रॅकीथेरपीची सुरू करणे हे जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार सर्वांसाठी सुलभ सहानुभूतिशील बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.
श्री महेश नांगिया, प्रमोटर, नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटल, म्हणाले नंगिया स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, उद्देश नेहमीच नागपूर आणि आसपासच्या भागात जागतिक दर्जाचे कॅन्सर उपचार उपलब्ध करून देण्याचा राहिला आहे, जेणेकरून रुग्णांना प्रगत उपचारासाठी लांब प्रवास करावा लागू नये. ब्रॅकीथेरपीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, कुशल डॉक्टरांच्या शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेडिएशन ऑन्कोलॉजीतल्या तज्ज्ञतेमुळे, खऱ्या अर्थाने संपूर्ण कॅन्सर उपचार एकाच ठिकाणी देऊ शकतो. लक्ष नेहमीच रुग्णांना उत्कृष्ट उपचार देणे, सहानुभूतिशील सेवा प्रत्येक रुग्ण व कुटुंबासाठी आशा निर्माण करणे आहे.
डॉ. हृषिकेश फाटे, झोनल डायरेक्टर – महाराष्ट्र छत्तीसगड, यांनी सांगितले: ब्रॅकीथेरपीच्या सुरुवातीसह, एओआय नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाणी संपूर्ण रेडिएशन थेरपीची सेवा उपलब्ध करून देते. हा टप्पा केवळ सर्वसमावेशक कॅन्सर उपचार क्षमतेला मजबूत करत नाही, तर या भागातील रुग्णांजवळ जागतिक दर्जाचे उपचार पोहोचवण्याच्या वचनबद्धतेला देखील बळकट करतो. तज्ज्ञ अनुभवी ऑन्कोलॉजिस्ट टीम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने, आम्हाला खात्री आहे की आम्ही रुग्णांचे वैद्यकीय परिणाम सुधारू शकू, रुग्णांना अधिक सोयीस्कर उपचार देऊ शकू त्यांच्या जीवनमानात सुधारणा करू शकू.
रेडिएशन ऑन्कोलॉजी टीमचे डॉ. चांदनी होतवानी, डॉ. मनीष माथनकर आणि डॉ. आशिष भांगे यांनी सांगितले, हॅल्सियन आणि ट्रूबीम तंत्रज्ञानामुळे अचूक बाह्य रेडिएशन उपचार शक्य झाले आहेत ब्रॅकीथेरपीच्या सुरुवातीसह संपूर्ण रेडिएशन थेरपीची साधने पूर्ण झाली आहेत.
कॅन्सर उपचारात आणखी एक महत्वपूर्ण उपलब्धी:
कॅन्सर उपचारात आणखी एक महत्वपूर्ण उपलब्धी एओआय नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटलने हॅल्सियन ट्रूबीम रेडिएशन तंत्रज्ञानासह ब्रॅकीथेरपी सेवा सुरु केली