SMAMAJIK

रोटरी क्लब नागपुर सेंट्रल २०२१-२२ साठी अध्यक्ष सतीश बैस यांची निवड

Nagpur Media News 13 Feb, 2021
रोटरी क्लब नागपुर सेंट्रल २०२१-२२ साठी अध्यक्ष सतीश बैस यांची निवड
रोटरी क्लब नागपुर सेंट्रल २०२१-२२ या वर्षाकरिता अध्यक्ष सतीश बैस यांची निवड करण्यात आली, सचिवपदी वासु ठाकरे, रोटरी क्लब नागपुर सेंट्रल यांच्या नुकत्याच झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर च्या बैठकीमध्ये वर्ष 2021 ते 2022 करिता, अध्यक्ष सतीश बैस यांची नुकतीच निवड झाली
नागपूर दि 12 फेब्रुवारी - रोटरी क्लब नागपुर सेंट्रल २०२१-२२ या वर्षाकरिता अध्यक्ष सतीश बैस यांची निवड करण्यात आली, सचिवपदी वासु ठाकरे, रोटरी क्लब नागपुर सेंट्रल यांच्या नुकत्याच झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर च्या बैठकीमध्ये वर्ष 2021 ते 2022 करिता, अध्यक्ष सतीश बैस यांची नुकतीच निवड झाली असून सचिवपदी वासु ठाकरे यांची निवड करण्यात आली. सध्याचे अध्यक्ष श्याम पांढरीपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये सर्वांच्या सर्वनुमते निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश यांनी रोटरी इंटरनॅशनल तसेच डिस्ट्रिक - R। Dist : 3030 चे मार्गदर्शक सूचनांचे पालन करून रोटरी क्लब तर्फे जन सामान्यापर्यंत सेवा करण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष सतिश बैस यांनी यावेळी व्यक्त केला आहे. याप्रसंगी माजी अध्यक्ष मोहन चौथनी, आलोक वैद्य, प्रदीप नगरारे, रमेश पंधागरे, अजय पंधे, डॉ. सीमा श्रीवास्तव, अरुण श्रीवास्तव, राजकुमारी रॉय, सचिव डॉ. अर्चना चौधरी आणि कोषाध्यक्ष सुरेश रायलु यांनी अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा दिल्या.(दि.12/02/2021)
Previous Story Next Story